महाराष्ट्र ताज्या बातम्या

किल्ले रायगडावरून मनसे सदस्य नोंदणीचा शुभारंभ; राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याला शिवतीर्थावर येण्याचे आवाहन  

Raj Thackeray launching the Maharashtra Navnirman Sena membership drive at Raigad Fort.

महाड  – स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी आज ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभही करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पक्षप्रमुख अमित ठाकरे तसेच पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर गडावरून खाली येऊन गडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात त्यांनी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची अधिकृत सुरुवात केली.

राज ठाकरे यांनी स्वतः किल्ले रायगड येथून सदस्य नोंदणीचा फॉर्म भरत या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी राज्यभरातून आलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

दरम्यान, आगामी १९ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर होणाऱ्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले. “गुढी पाडव्याला शिवतीर्थावर वाजतगाजत जल्लोषात या आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा,” असे आवाहन त्यांनी केले.end

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात