मुंबई
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. राजकारणात दोघं एकत्र कधी येणार, याबद्दल सांगणं कठीण, मात्र कौटुंबिक कार्यक्रमासाठी दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे.
राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले. आज मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकेर एकत्र आले होते.
राज ठाकरेंचा भाचा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आले.
साखरपुडा समारंभासाठी उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांमध्ये या कार्यक्रमात चर्चा झाली. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही भावांनी एकमेकांची विचारपूस केली. तसेच, या कार्यक्रमात रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचीही भेट झाली. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मातोश्रींसोबत संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली.