महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raj Thackeray: हिंदी लादाल तर संघर्ष अटळ! – मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी सक्तीविषयी सरकारला जोरदार इशारा दिला आहे. “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त एक राज्यभाषा आहे. महाराष्ट्रात पहिलीपासून ती शिकण्याची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही,” असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडले.

ते पुढे म्हणाले की, “सरकारने त्रिभाषा सूत्र फक्त सरकारी व्यवहारांपुरते मर्यादित ठेवावे. शिक्षणात ते आणू नये. हे हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच सन्मान राखला गेला पाहिजे. उद्या इतर राज्यांमध्ये मराठी पहिलीपासून शिकवणार आहात का?”

राज ठाकरे यांनी असा आरोपही केला की सरकार जाणूनबुजून मराठी विरुद्ध मराठीतर असा संघर्ष उभा करून राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे. आर्थिक अडचणी, शेतकरी निराशा आणि बेरोजगारी झाकण्यासाठी सरकार “फोडा आणि राज्य करा” ही नीती राबवत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

“आज भाषा लादत आहेत, उद्या आणखी काही लादतील,” असा इशारा देत त्यांनी सर्व मराठी जनतेला, पत्रकारांनाही आवाहन केले की कुठलाही वाद न करता या निर्णयाचा निषेध करावा. “सरकारने लोकभावनेचा आदर करून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात