
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते.

भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वर्षभरात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या विविध कारणांसाठी अनेकदा भेटी झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना या भेटीमागे काही राजकीय समीकरणं आहेत का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.