महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजकारण Impact : अखेर पुरातत्व विभाग नरमले; दंडासह RS 56,510 रक्कम अदा

महाड: दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रकाशाच्या पर्वातही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला अंधारात बुडाल्याची बातमी मंगळवारी “राजकारण” (TheRajkaran)ने उघड केल्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले. तब्बल नऊ महिन्यांपासून थकीत असलेले वीज बिल पुरातत्व विभागाने भरले आहे. दंडासह ही रक्कम ₹56,510 इतकी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडावर दिवाळीच्या दिवशी उजेडाऐवजी अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळाले. ही बाब “राजकारण” ने उघडकीस आणली. होताच जनतेत तीव्र नाराजी व्यक्त झाली. त्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत पुरातत्व विभागाला जाब विचारला.

सरकारी यंत्रणेकडील निष्काळजीपणामुळे रायगडावरील दीपोत्सवात आलेल्या हजारो शिवभक्तांना अंधारातच सोहळा पार पाडावा लागला. मात्र शिवभक्तांनी दीपदान करून संपूर्ण किल्ला उजळून निघाला.

थकीत व भरलेली रक्कम (विज विभागानुसार)

ठिकाण थकबाकी दंडासह भरलेली रक्कम
बुकिंग ऑफिस ₹6,588 ₹9,470
जगदीश्वर मंदिर ₹11,708 ₹12,480
राजदरबार ₹23,323 ₹24,000
रायगड मीटर नं. 1 — ₹7,320
रायगड मीटर नं. 2 — ₹3,240
एकूण भरणा ₹41,619 ₹56,510

राजकीय फायद्यासाठी राज्यातील सर्व पक्षांचे नेते “शिवाजी महाराज”चा नारा देतात; परंतु थकीत ₹50 हजार भरण्यासाठी कोणताच पुढारी पुढे न आल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.

Also Read: रायगड पुन्हा अंधारात! केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट?

“महाराजांचे नाव घेऊन राजकारण, पण रायगडाचा उजेड करायला पन्नास हजारही नाही?” — स्थानिकांचा सवाल

महत्त्वाचे मुद्दे
• 9 महिन्यांपासून वीजबिल थकित
• दिवाळीच्या दिवशी दीपोत्सवादरम्यान किल्ला अंधारात
• संभाजीराजेंनी प्रकरणाची तात्काळ दखल
• दंडासह बिल भरल्यानंतर प्रकरण शांत

”राजकारण” Impact

TheRajkaran च्या वृत्तानंतर प्रशासनाची धावपळ; रायगड किल्ल्यावरील वीजबिल प्रकरणात तातडीची कार्यवाही

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात