मुंबई
सोयाबीन-कापूस उत्पादनासारख्या शेतकऱ्यांच्या विविध विषयांसाठी लढणारे स्वाभिमानी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी शेतकरी बांधवांची कानउघडणी केली आहे. एकाच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तर यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर कांदा कवडीमोल भावात विकला. दुसरीकडे दुधाचे दर वाढावे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र अद्यापही दुधाचे दर वाढलेले नाही. यासारखे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर संकटासारखे उभे आहेत.
पाहा काय म्हणाले तुपकर Video – https://www.facebook.com/therajkaran/videos/690184466627654
काय म्हणाले रवीकांत तुपकर…
व्हॉट्सअॅपवर कमेंट करून सोयाबीनचे भाव वाढणार नाही तर यासाठी शेतकऱ्यांचा प्रभावी दबावगट निर्माण व्हायला हवा. रवीकांत तुपकर साऊथचा हिरो नाही. की फक्त जादुची कांडी फिरवून भाव वाढतील. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यायला हवं. शेतकऱ्यांची राजकीय वॉट बँक निर्माण झाली तर सरकारवर प्रभाव राहिल. दुर्देवाने शेतकरी जाती-धर्मात, पक्षापक्षांमध्ये विभागला गेला आहे. याची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे आपल्या मुद्द्यावर कायम राहायला हवं आणि त्यासाठी लढायला हवं. कांदा निर्यात बंदी, दुधाचे वाढलेले दर, सोयाबीनला न मिळणारा भाव यावर मतदान होत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं तर आपल्या मागण्या मान्य होतील. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं.