ताज्या बातम्या महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाची सिक्कीम राज्यात स्थापना – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

गंगटोक/मुंबई : रिपब्लिकन पक्षाची सिक्कीम राज्यात स्थापना झाल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली. रँग्पो शहरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली.

या मेळाव्यात सिक्कीम राज्य कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. नामग्याल भोतिया यांची सिक्कीम राज्य अध्यक्ष म्हणून, तर हरिप्रसाद बुरुम यांची राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वेळी पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, राष्ट्रीय सचिव महेश्वर थानांजॉम, विजय बोरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ना. आठवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अधिष्ठान असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सिक्कीमच्या गावागावात पोहोचवा.” ते पुढे म्हणाले की, “राज्याच्या विकासासाठी आणि येथील जनतेला न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कार्यरत राहील. भारत सरकारकडून सिक्कीमच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले जाईल.”

नामग्याल भोतिया हे नामवंत समाजसेवक असून त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानावर पीएच.डी. केली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष बळकट होईल, असा विश्वास ना. आठवले यांनी व्यक्त केला.

ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले असून, सर्व केंद्रीय मंत्र्यांनी तेथील दौरे करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती ना. आठवले यांनी यावेळी दिली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात