राष्ट्रीय

रेवंथ रेड्डींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तब्बल 1 लाख जणांची उपस्थिती

तेलंगणा

काँग्रेसचे अनुमुला रेवंथ रेड्डी यांनी आज तेलंगणात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रेवंथ रेड्डींसह 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 56 वर्षांचे रेवंथ रेड्डी यांच्या शपथ विधीचा (Revanth Reddy took oath as Chief Minister of Telangana) कार्यक्रम लाल बहादुर शास्त्री स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आला होता.

शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस समितचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आदी सामील झाले. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 1 लाख लोक उपस्थित होते.

https://twitter.com/RahulGandhi/status/1732285127353319924/photo/3

रेवंथ रेड्डी शपथ विधी सोहळ्यात एका ओपन जीपने पोहोचले. ही जीप फुलांनी सजवण्यात आली होती. रेवंथ रेड्डींनी या सोहळ्यात सामील होण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं होतं आणि जनतेचं सरकार आज कार्यभार सांभाळेल असं सांगितलं होतं.

निवडणुकीत जनतेला दिलेली 6 आश्वासनं पूर्ण करण्याचं आव्हान

  • महिला केंद्रीय कल्याणकारी कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी दर महिना 2500 रुपये, 500 रुपये गॅस सिलिंडर आणि सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत
  • काँग्रेसने 10 लाखांचा विमा देण्याचं आश्वासन
  • घरासाठी जागा आणि घराच्या निर्मितीसाठी 5 लाख
  • गृह ज्योती योजनेअंतर्गत पात्र घरांना 200 युनिट वीज मोफत
  • युवा विकास योजनेनुसार विद्यार्थ्यांना 5 लाखांची मदत
  • ज्येष्ठ, विधवा, दिव्यांग, बिडी मजूर आदी भागातील रुग्णांसह डायलेसिस करणाऱ्या किडनीचा आजार असणाऱ्या रुग्णांना दर महिन्याला 4000 रुपये पेन्शन
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे