ताज्या बातम्या राष्ट्रीय

अखेर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; चर्चेतली नावं पडली मागे, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

जयपूर

मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेकांची नावं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. मात्र त्या नावांच्या पलीकडे जात पक्षश्रेष्ठींनी भजन लाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. सांगानेरचे आमदार भजन लाल शर्मा यांना राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून घोषित (Sanganer MLA Bhajan Lal Sharma is the new Chief Minister of Rajasthan) करण्यात आलं आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्याच्या घोषणासह दोन उपमुख्यमंत्र्यांची नावंही जाहीर करण्यात आली आहे. दीया कुमारी आणि प्रेम चंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्रिपदावर बसवण्यात आलं आहे. तर वासुदेव देवनानी यांची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत भजन लाल शर्मा?
भजन लाल शर्मा हे भरतपूरचे राहणारे आहेत. बाहेरील असतानाही त्यांनी निवडणुकीत सांगानेरमध्ये मोठ्या फरकाने यश मिळवलं होतं. शर्मा यांनी काँग्रेसचे पुष्पेंद्र भारद्वाज यांना 48081 मतांनी हरवलं होतं. भजन लाल शर्मा संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दोन्हीच्या जवळचे असल्याचं मानलं जातं.

भाजपने त्यांना पहिल्यांदाच जयपूरच्या सांगानेर सारख्या सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितली होती. आणि पहिल्याच निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. त्या जागेवरील आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजन लाल शर्मा यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. भजन लाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले होते. ते चार वेळा प्रदेश महामंत्री राहिले आहेत.

कोणत्या नावांची होती चर्चा
राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी वसुंधरा राजे यांचं नाव चर्चेत होतं. याशिवाय बाबा बालकनाथ, गजेंद्र शेखावत, सीपी जोशी, दीया कुमारी आणि राजवर्धन राठोड यांसारखे नेते शर्यतीत होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे