मुंबई
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला काँग्रेसची, इंडिया आघाडीची भीती वाटते. म्हणून प्रत्येक भाषणात जवाहरलाल नेहरूंचा जप केला जातो. गेल्या १० वर्षातील मोदींचं एकही भाषण असं नाही ज्यात पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचा उल्लेख केलेला नसेल. तुम्ही स्वत:बद्दल बोला… वारंवार काँग्रेसबद्दल का बोलता,’ अशा शब्दात संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावर टीका केली.
पंडित नेहरूंच्या मृत्यूला ६० वर्षे झाली. पण गेल्या १० वर्षांपासून मोदी त्यांच्या नावाचा जप करीत आहेत. मात्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदावरुन दूर होतील, तेव्हा त्यांचे स्मरण कोणालाही राणार नाही, असं वक्तव्य राऊतांनी केलं.
प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल यांच्यावर भंडारा लोकसभा मतदारसंघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याची जबाबदारी होती, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याच प्रफुल्ल पटेल यांना भाजपसोबत घेतले आहे, असे म्हणत भाजपने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाच्या केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
वेंद्र फडणवीस सध्या विदर्भात चाय पे चर्चा करत फिरत आहेत. ती चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे, रोज त्यांच्या पक्षात गुंडांना प्रवेश देत आहेत. रोज मी त्या संदर्भातला एक फोटो लोकांसमोर आणतोय. आजही टाकला आहे, असंही ते बोलताना म्हणाले.