मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सदस्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रांचा सहभाग असलेले वार्षिक कॅलेंडर प्रकाशित केले जाणार आहे.
“आपल्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणांची सुवर्ण साठवण करण्याची ही नामी संधी आहे,” असे संघाने कळवले.
स्पर्धेत संघाचे सर्व सदस्य सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी कार्यकारिणी सदस्य अंशुमन पोयरेकर (मो. ९८९२०९७९६५) यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेच्या अटी व मार्गदर्शक तत्त्वे
1. स्पर्धा फक्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी खुली आहे.
2. कॅलेंडरची थीम – ‘जिगरबाज मुंबई’. एमएमआरडीए परिसरातील छायाचित्रे अपेक्षित; रक्तरंजित वा त्रासदायक फोटो टाळावेत.
3. प्रत्येक सदस्याने कमाल १२ छायाचित्रे सादर करावीत. अधिक छायाचित्रे पाठविल्यास प्रवेशिका अपात्र ठरेल.
4. छायाचित्र JPEG फॉरमॅटमध्ये, किमान ३०० DPI, ८०० KB ते २ MB आकारात आणि 1920×1080 पिक्सल साईजमध्ये असावे.
5. प्रत्येक फोटोसोबत कॅप्शन, सदस्याचा संक्षिप्त बायोडेटा (५० शब्द) व पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
6. छायाचित्रे केवळ photo.mmps@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत.
7. प्रवेशाची अंतिम तारीख: ७ ऑक्टोबर २०२५. अंतिम मुदतीनंतर आलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
8. फोटो कालावधी: १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यानचे असणे आवश्यक.
9. फोटोवर सदस्याची ओळख दाखवणारा कोणताही उल्लेख नसावा. कॉपीराईटची जबाबदारी स्पर्धकाची राहील.
10. परीक्षक मंडळ ३ जणांचे असेल.
11. १२ विजेत्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व प्रत्येकी ₹१०,००० चे पारितोषिक दिले जाईल. विजेते फोटो कॅलेंडरमधील १२ महिन्यांसाठी वापरले जातील.
12. स्पर्धेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर केला जाईल.
संघाने स्पष्ट केले आहे की, अपुरी माहिती असलेली वा उशिरा आलेली नोंदणी बाद करण्याचा पूर्ण अधिकार आयोजकांकडे राहील. तसेच विजेत्या छायाचित्रांचे कॅलेंडर प्रकाशन म्हणजेच संबंधित छायाचित्रांच्या कॉपीराईटला दिलेली मान्यता असेल.