भारताचे माजी पंतप्रधान आणि लोकप्रिय नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त, भाजपा आमदार आणि नगरसेवक श्री. अतुल शाह यांनी विशेष उपक्रम हाती घेतला. मंगळवारी, २४ डिसेंबर २०२४ रोजी सी. पी. टँक रोडवरील ए. के. मुंशी शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांसोबत सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर, शाळेतील विद्यार्थी कु. मिलिंद सोनुले याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. ह्या वेळी शाळेतील विद्यार्थी कु. अश्फाक खान याने दोन गाणी सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांची झलक पाहायला मिळाली.
विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्याची गरज
या विद्यार्थ्यांकडे असलेले असामान्य कलागुण समाजातील प्रत्येक घटकाने ओळखावे आणि त्यांना योग्य प्रोत्साहन द्यावे, अशी भावना आमदार अतुल शाह यांनी व्यक्त केली. दिवाळीत विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध कंदील आणि चित्रकला प्रदर्शनानेही उपस्थितांचे लक्ष वेधले. अतुल शाह यांनी सांगितले की, “या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी सरकारी आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा.”
प्रमुख उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला शिवसेना उपविभाग प्रमुख पद्मजा वेदपाठक आणि त्यांच्या सहकारी, प्रेम शर्मा, मिनाबेन लेहरू, मनोज चौरसिया, बळवंत गायकवाड, मुकेश गावकर, पप्पुभाई चौरसिया, आश्विन कांबळे, राजा पाटील, हबीब नौरंगे, वीरेंद्र मिस्त्री आणि श्री. राजभर यांनी सहभाग घेतला.
शाळेच्या व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. यामध्ये मॅनेजिंग कमिटी सदस्य भारती दोशी, छाया व्यास, प्रिन्सिपल अजीतकुमार चांगण आणि विशेष शिक्षक संगीता कांबळे, योगिता परब, वर्षा डोकरे, दीपाली कांबळे, पूजा रंजक, उज्ज्वला पेटकर, आशा मांजरेकर, छाया भालेकर आणि अवधूत नेमाने यांचा समावेश होता.
उद्याचा उपक्रम – खिचडी वाटप कार्यक्रम
स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, २५ डिसेंबर २०२४ रोजी जय अंबे चौक, भुलेश्वर येथे सकाळी ११.३० वाजता खिचडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमदार अतुल शाह यांनी सर्व कार्यकर्त्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.