पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महत्त्वाची घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत रवींद्र वायकर यांनी ईडीच्या भीतीने रविवारी १० मार्च रोजी शिंदेच्या गटात प्रवेश केला. दुसरीकडे रोहित पवार यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे ईडीच्या कारवाईवरही शरद पवार आज भूमिका मांडतील असं सांगितलं जात आहे. आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून आज ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून शरद पवार पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत.