ताज्या बातम्या महाराष्ट्र

पवार घराण्याच्या नव्या वारसदाराची राजकारणात एन्ट्री?

बारामती

शरद पवारांनंतर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, नातू रोहित पवार आणि पार्थ पवार राजकारणात सक्रिय आहेत. आता पवार घराण्याचा नवा वारसदार सक्रिय राजकारणात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव राजकारणात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ते अजित दादांसोबत न जाता आजोबांकडून राजकीय धडे घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवार कुटुंबातील नव्या वारसदाराबाबत चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. हे आयोजन अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी केलं आहे. युगेंद्र पवार सध्या बारामतीत सक्रिय असून येथील कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असतो. त्यात कुस्ती स्पर्धेच्या पोस्टरवर शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचे फोटो झळकल्यानंतर राजकीय वर्तुळात पवार घराण्यातील नव्या वारसदाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. ते नेहमीच आजोबांसोबत उभं राहिल्याचं दिसतं. युगेंद्र शांत, मितभाषी असले तर चांगले संघटन असल्याचंही सांगितलं जातं.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात