मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विचार मंच’तर्फे ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या हस्ते पोंक्षे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख ₹५१,००० देऊन गौरवण्यात आले.
याच कार्यक्रमात ‘पुरुष’ नाटकाचे नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या नाटकाच्या निर्माते संतोष काणेकर, श्रीकांत तटकरे, दिग्दर्शक राजन ताम्हाणे तसेच कलाकार अविनाश नारकर, स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, नेहा परांजपे, निषाद भोईर, संतोष पैठणे, ऋषिकेश रत्नपारखी आणि पुरस्कर्ते राजेश गाडगीळ यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
दादर येथील शिवाजी मंदिरात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यास चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील अनेक दिग्गजांसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी