महाराष्ट्र ताज्या बातम्या

Shakti Peeth Highway : शक्तीपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातून कडाडून विरोध

शेतकऱ्यांची जमीन जाणार असेल तर संघर्ष अटळ” — स्वाभिमानी शेतकरी संघटना

सांगली/ईश्वरपूर : राज्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातून जाण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना हा महामार्ग लादला जात असून, सुपीक शेती आणि पूरप्रवण भाग धोक्यात येणार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवत जाधव यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले की, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. शक्तीपीठ महामार्गासाठी वाळवा तालुक्यातील एक इंचही जमीन दिली जाणार नाही.”

जाधव यांनी सांगितले की, प्रस्तावित महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुपीक शेती मोठ्या प्रमाणात बाधित होणार असून कृष्णा नदी परिसरातील पूरप्रवण भागात भविष्यात गंभीर धोके निर्माण होऊ शकतात.

“२०१९ मधील महापुराचा अनुभव अजून ताजा आहे. अशा परिस्थितीत हा निर्णय शेतकऱ्यांसाठी विनाशकारी ठरेल,” असे ते म्हणाले.

या महामार्गाला विरोध करत माजी खासदार राजू शेट्टी, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला कृषी आमदार सतेज पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या रेखांकनासह उभारणीची घोषणा केली होती. महामार्ग विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी या घोषणेनंतर वाळवा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. 

भगवत जाधव म्हणाले, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे विस्थापन आम्ही सहन करणार नाही. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही प्रकल्प मंजूर होऊ देणार नाही.”

कोल्हापूर जिल्ह्यात विरोध तीव्र झाल्यानंतर हा महामार्ग वाळवा तालुक्यातून वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. “हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

प्रस्तावित महामार्गामुळे अनेक गावांतील शेती, घरे आणि पाणलोट क्षेत्र बाधित होणार असल्याचे सांगत, शासनाने तातडीने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात