महाराष्ट्र ताज्या बातम्या

तांडा, वाडी वस्त्यांवरील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रथमच विधानभवनाला भेट

ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने अनोखी संधी

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत पुणे विभागातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना आज राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळाली.

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक आश्रमशाळा चालवल्या जातात. याच उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 56 मुली आणि 44 मुलांनी विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज पाहिले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी शासनाच्या प्रयत्नांविषयी माहिती देताना सांगितले की,आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची व कुटुंबाची प्रगती साधत राष्ट्राच्या भल्यासाठी सकारात्मक योगदान देणारे सक्षम नागरिक बनावेत, हा शासनाचा प्रयत्न आहे.
या भेटीअगोदर विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट दिली.

ही भेट विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरली, असे उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात