महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुल्झर पंप्समध्ये अडीच लाखांहून अधिक बोनस; कमाल रक्कम ₹2.61 लाख

नवी मुंबईतील सुल्झर पंप्स इंडिया येथे बोनस वितरणानंतर एकत्र आलेले कामगार आणि युनियन प्रतिनिधी

गणेशोत्सवापूर्वी कामगारांना बोनसचे वाटप; गतवर्षीच्या तुलनेत कमाल आणि किमान दोन्ही रकमांमध्ये वाढ

नवी मुंबई : दिघा येथील सुल्झर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांना यंदा अडीच लाख रुपयांहून अधिक बोनस देण्यात आला आहे. सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियनने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ वर्षासाठी कमाल ₹२,६१,३८० तर किमान ₹२,४६,८६३ इतका बोनस ८ सप्टेंबर रोजी कामगारांना देण्यात आला. कंपनीत दिवाळीचा बोनस करारानुसार गणेशोत्सवापूर्वी देण्याची पद्धत आहे. ९ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या वेतनवाढ आणि बोनस करारानुसार यंदाचे बोनस वाटप करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. गतवर्षी २०२४ वर्षासाठी कमाल ₹२,४३,३११ आणि किमान ₹२,२५,२३९ इतका बोनस देण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा कमाल बोनसची रक्कम ₹१८,०६९ ने, तर किमान बोनसची रक्कम ₹२१,६२४ ने वाढली आहे.

सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार, सरचिटणीस प्रमोद लोटणकर आणि खजिनदार माधव सकपाळ यांच्या उपस्थितीत बोनससंदर्भातील सभा झाली. कंपनीतील कामगार जयकांत कदम यांचे काही दिवसांपूर्वी घरी असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे सभेच्या सुरुवातीला उपस्थित कामगारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सहकाऱ्याच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बोनस मिळाल्याचा कोणताही गाजावाजा न करता सभा साधेपणाने घेण्यात आली. बोनसच्या रकमेकडे केवळ सणासुदीचा अतिरिक्त पैसा म्हणून न पाहता तिचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार यांनी कामगारांना केले. बोनस कराराची अंमलबजावणी केल्याबद्दल कामगारांनी कंपनी व्यवस्थापन आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुजल शहा तसेच मानव संसाधन विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याचाही युनियनने उल्लेख केला.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात