ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरोधात सुषमा अंधारे?

X : @milindmane70

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha constituency) निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातील दलित व बहुजन समाजाची मते निर्णायक ठरणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल. 

कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी अंबरनाथ येथे बालाजी किणीकर (शिवसेना शिंदे गट), उल्हासनगर कुमार आयलानी (भाजपा), कल्याण पूर्व गणपत गायकवाड (भाजप पुरस्कृत अपक्ष), डोंबिवली रवींद्र चव्हाण विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री (भाजपा), कल्याण ग्रामीण राजू रतन पाटील (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मुंब्रा – कळवा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) असे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. शिंदे गटाचा एकमेव आमदार या मतदारसंघात असून भाजपा, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांच्या मतांवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. 

सन 2009 पासून शिवसेना पक्षाची या मतदारसंघावर पकड कायम आहे. सन 2009 ते 2014 या काळात आनंद प्रकाश परांजपे,  2014 ते 2019 व 2019 ते 2024 पर्यंत श्रीकांत शिंदे असे शिवसेना पक्षाचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 

या मतदारसंघात ब्राह्मण, कुणबी, दलित, आगरी, कोळी, बहुजन व सिंधी समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. या मतदारसंघात 2014 व 2019 नंतर लोकसभा निवडणूक 2024 ला सामोरे जाताना राजकीय परिस्थिती व सामाजिक परिस्थिती देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. त्यातच मागील दोन महिन्यात या मतदारसंघात मोठ्या घडामोडी झाल्या. कल्याण पूर्व मधील भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार केला. या घटनेत गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपी तळोजा कारागृहामध्ये स्थानबद्ध आहेत.  

या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना मनसेचे राजू रतन पाटील, उल्हासनगरचे कुमार आयलानी यांच्याबरोबर पप्पू कलानी गट, मुरबाड विधानसभाचे आमदार किसन कथोरे यांचा पूर्वीचा अंबरनाथ मतदार संघ व त्यांची कुणबी समाजावर असलेली पकड, विद्यमान खासदार शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर कल्याणमध्ये त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर झालेली नाराजी, त्याचाच फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेण्याचे ठरवले आहे.  

त्यासाठी ठाकरे यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन श्रीकांत शिंदे यांना धक्का देण्याची तयारी चालवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदार संघावर जातीने लक्ष देत असल्याची चर्चा शिवसैनिकांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे. 

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात