महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटीत पुन्हा सुरू करणार स्वच्छ , सुंदर बसस्थानक अभियान : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : स्वच्छ बस स्थानक,सुंदर व नीटनेटके बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मुलभूत कर्तव्यच असून त्यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश असल्याची घोषणा राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी पनवेल व खोपोली बसस्थानकाला भेट देताना नंतर पत्रकारांशी बोलताना केली.

आधुनिक युगामध्ये “स्वच्छता” हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो.त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ,सुंदर बसस्थानक,बस स्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे पुरवणे याला भविष्यात आमच्या कडून प्राधान्य देण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांतीगृहे देखील स्वच्छ आणि निटनेटकी असावेत यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या भेटीमध्ये सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तेथील प्रशासनाला अस्वच्छतेबाबत खडे बोलही सुनावले. तसेच बसस्थानकावरील आरक्षण खिडकी,पिण्याच्या पाण्याची सोय याचीही पाहणी करत फलाटावर जाऊन प्रवाशांशी संवादही साधला, व त्यांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या.तसेच त्यांच्या तक्रारीचे तातडी निवारण करण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित एसटी अधिकाऱ्यांना दिले.

पनवेल ते खोपोली एसटी बसमधून प्रवास……
या भेटीमध्ये सरनाईक यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबर पनवेल ते खोपोली या मार्गावर एसटीच्या लालपरीतून प्रवासही केला.या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशीही संवाद साधला.बसमधील सहप्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य प्रवासी यांनी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, बसेस स्वच्छ व यांत्रिक दृष्टीने निर्दोष असावेत अशी मागणी त्यांच्याकडे केली.यावेळी सरनाईक म्हणाले की लवकरच एसटीचे ताफ्यामध्ये नव्या बसेस उपलब्ध होत असून या बसेस आल्यानंतर पनवेल-खोपोली,पनवेल -अलिबाग आणि पनवेल- कल्याण या मार्गावर नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे ठाम आश्वासनही त्यांनी दिले.

बसस्थानक परिसरातील स्क्रॅप वाहने तातडीने हलविण्याचे निर्देश….

प्रवाशांच्या वाहतुकीची गैरसोय करून परिवहन विभाग व अन्य विभागांनी बस स्थानकाच्या परिसरात अडगळीत टाकलेली स्क्रॅप वाहने तातडीने इतर ठिकाणी उचलून न्यावीत असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात