महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतात पीक नुकसानीचा पंचनामा, 19 अतिरिक्त तालुक्यांसाठी दुष्काळी उपाययोजना आणि दिवाळीपूर्वी शेतकरी मदतीचे उद्दिष्ट दर्शवणारे प्रातिनिधिक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न; आणखी 19 तालुक्यांना दुष्काळी सवलतींचा दिलासा

पंचनामे अचूक आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारी गेल्यास कारवाईचा इशारा मुंबई — राज्यातील दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचवेळी दुष्काळी परिस्थिती असूनही ‘ट्रिगर-वन’च्या निकषाबाहेर राहिलेल्या तालुक्यांचाही प्रत्यक्ष परिस्थिती, पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे विचार करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे, अशी माहिती महसूल […]

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या जागावाटपावर महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे प्रातिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे–नागपूरच्या जागांवर महायुतीत रस्सीखेच; कोणाची जागा कुणाला?

भाजप–शिवसेना–राष्ट्रवादीचे दावे आमनेसामने; पाच विधान परिषद जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, आज फडणवीस–शिंदे–सुनेत्रा पवार यांच्या बैठकीकडे लक्ष मुंबई  — महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा पेच आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांपासून नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीपर्यंत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध जागांवर दावे पुढे […]

सारथीला मराठा विद्यार्थ्यांच्या आठ वसतिगृहांसाठी ₹122.34 कोटी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एकूण ₹600 कोटी निधी महाराष्ट्र ताज्या बातम्या

सारथीला ₹122.34 कोटी; अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणखी ₹150 कोटी

मराठा विद्यार्थ्यांच्या आठ वसतिगृहांना निधीचे बळ; पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे नियोजन — महामंडळाला चालू आर्थिक वर्षात मिळालेला निधी ₹600 कोटींवर  मुंबई — मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना गती देतानाच युवकांच्या आर्थिक विकास योजनांसाठी राज्य सरकारने आणखी निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) वसतिगृहांच्या कामासाठी ₹122 […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समितीची बैठक महाराष्ट्र ताज्या बातम्या

चार टक्क्यांनी पडून असलेला निधी, बाजारातून 8-9 टक्क्यांनी कर्ज कशासाठी?

महाराष्ट्राच्या वित्तव्यवस्थेची होणार फेररचना; ₹6-7 हजार कोटींच्या उपलब्ध निधीच्या कार्यक्षम वापरासाठी नवी यंत्रणा, विजय केळकर समितीला सहा महिन्यांत ‘फायनान्शियल रोडमॅप’ देण्याचे निर्देश मुंबई : राज्याच्या विविध यंत्रणांकडे सुमारे ₹6 ते ₹7 हजार कोटींचा निधी केवळ चार टक्के व्याजदराने गुंतवलेला असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारला आपल्या आर्थिक गरजांसाठी बाजारातून 8 ते 9 टक्के व्याजदराने कर्ज उभारावे लागते—राज्याच्या […]

महावितरणचा प्रस्तावित IPO, सरकारी मालकी आणि महाराष्ट्राच्या वीज क्षेत्रातील आर्थिक पुनर्रचना दर्शवणारे संपादकीय चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

वीज कंपन्या सरकारीच…; मात्र महावितरणच्या आर्थिक पुनर्रचनेला ‘IPO’ची जोड…!

खासगीकरणाला मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट नकार; महावितरणच्या पुनर्रचनेला वेग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा; कंत्राटी कामगारांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा अभ्यास मुंबई — राज्यातील महापारेषण, महावितरण आणि महाजेनको या सरकारी वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मांडली. मात्र या कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून खासगी क्षेत्राशी स्पर्धा करण्यासाठी पुनर्रचना, कार्यक्षमता […]

Maharashtra loose edible oil shop with FDA inspection and 12-month transition period for traders to comply with food safety rules महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुट्या खाद्यतेलावर FDAची कारवाई वर्षभरासाठी स्थगित; कायदा मात्र कायम!

व्यापाऱ्यांना ‘ट्रांझिशन’ दिलासा; नियमांचे पालन करण्यासाठी एक वर्षाची मुदत, त्यानंतर वाढ नाही मुंबई  — राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीविरोधातील अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे अडचणीत आलेल्या पारंपरिक खाद्यतेल व्यावसायिकांना राज्य सरकारने मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या खाद्यतेल विक्रीवरील FDAची कारवाई एक वर्षासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर करत, या काळात व्यापाऱ्यांनी विद्यमान […]

निवृत्त पोलीस श्वान आपल्या हँडलरसोबत पोलीस श्वान पथकाच्या केंद्रात — प्रतिनिधिक AI illustration महाराष्ट्र ताज्या बातम्या

दहा वर्षांच्या सेवेनंतरही ‘घर’ सोडावे लागणार नाही; निवृत्त पोलीस श्वान राहणार दलासोबतच

मुंबई : गुन्हेगारांचा माग काढण्यापासून स्फोटके आणि अमली पदार्थ शोधण्यापर्यंत पोलीस दलासोबत वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतर आता दलापासून वेगळे व्हावे लागणार नाही. दहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या पोलीस श्वानांना पोलीस दलातच ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. निवृत्त श्वानांच्या आहार, आरोग्य आणि आवश्यक देखभालीचा खर्चही पोलीस दलाकडून करण्यासाठी […]

महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम २०२६ अंतर्गत मंत्र्यांच्या निर्णयांवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेख, सार्वजनिक हितातील फेरतपासणी आणि महायुतीतील सत्तासंतुलनाचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

यापुढे मंत्र्यांच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची ‘अंतिम नजर’……!

सार्वजनिक हिताच्या कारणावरून निर्णय बदलण्याचा फडणवीसांना स्पष्ट अधिकार; महायुतीतील सत्तासंतुलनाची नव्याने मांडणी मुंबई  — महाराष्ट्राच्या सत्ताकारणात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अधिकारसंबंधांना नवी दिशा देणारा महत्त्वाचा बदल झाला आहे. नव्याने अधिसूचित करण्यात आलेल्या **‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६’**मुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय व्यापक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे वाटल्यास त्यात हस्तक्षेप करून तो बदलणे, सुधारित […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘दिल्ली मोहीम’…..!

पंतप्रधान मोदींसह सीतारामन, यादव यांच्या भेटी; उत्तन-विरार सागरी दुव्यासाठी निधीचा नवा मार्ग, प्रलंबित प्रकल्पांना केंद्राचा ‘पुश’ मिळविण्याचाही प्रयत्न मुंबई  — महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केवळ राज्याच्या पातळीवर न ठेवता थेट केंद्राच्या दारात नेऊन त्यांना निधी, मंजुरी आणि धोरणात्मक पाठबळ मिळवून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती सोमवारी दिल्ली दौऱ्यात स्पष्टपणे दिसून आली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

चाकण MIDCमधील खराब रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक परिसराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उद्योग आकडेवारी आणि प्रत्यक्ष पायाभूत समस्यांतील विरोधाभास दर्शविणारे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३६ हजारांचा ‘आकड्यांचा खेळ’ की चाकणचा ‘खड्ड्यांतला उद्योग’…….?

वाजेंच्या संसद प्रश्नापासून पवारांच्या पाहणीपर्यंत उद्योग स्थलांतराचा मुद्दा तापला; मुख्यमंत्री फडणवीसांचा बचाव आकडेवारीवर, पण चाकणमधील २० उद्योगांच्या संभाव्य स्थलांतराचा प्रश्न कायम……! Anant Nalawade मुंबई — महाराष्ट्राच्या औद्योगिक आघाडीला आता आकडेवारीच्या कागदावर नव्हे, तर चाकणच्या रस्त्यांवरून कसोटीला उतरावे लागणार आहे….! त्याला कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातील ३६,२११ खासगी कंपन्या गेल्या पाच आर्थिक वर्षांत liquidated, dissolved अथवा कंपनी रजिस्टरमधून struck off […]