ताज्या बातम्या महाराष्ट्र

डॉ आंबेडकरांचा फोटो फडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक करा – शिवसेना

X : @nalavadeAnant मुंबई – शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिउत्साही स्टंटबाज नेते जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडला आहे, हा संपूर्ण देशाचा, आंबेडकरी जनतेचा अपमान असून जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध तर करतोच, पण डॉ. बाबासाहेब […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावला? वंचित मविआतून बाहेर…. मात्र काँग्रेसला सात जागांचा प्रस्ताव

X : @NalavadeAnant मुंबई: महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार व ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे जागावाटपात आपल्याला धोका देत आहेत असा ग्रह झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी एक पत्रक काढत ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावल्याची टिका करत थेट मविआतून बाहेर पडल्याचे जाहीर केले. मात्र काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांवर पाठिंबा देण्याची […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]

महाराष्ट्र

डॉक्टरांच्या मागण्यांबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार; मार्डने संप मागे घ्यावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

X : @NalavadeAnant मुंबई: मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला येत्या रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवसेनेचे कोल्हापूरात दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन

X : @NalavadeAnant मुंबई: शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार, १६ व १७ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केले जाणार आहे. या राज्यव्यापी महाअधिवेशनाबद्दल माहिती देताना शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव किरण पावसकर म्हणाले की, २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार पक्षांतर्गत गँगवॉरमधून; उद्योगमंत्री उदय सामंत

By अनंत नलावडेX : @NalavadeAnant मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवीच घटना असल्याचे सांगत ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा विरोधकांच्या प्रयत्नांचा उदय सामंत यांनी शुक्रवारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मला मंत्रिपदावरून काढले तरी हरकत नाही – छगन भुजबळ

X : @NalavadeAnant मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि सत्तारूढ पक्षातील अजित पवार गटाचे मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत असताना सोमवारी भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही नेत्यांना अंगावर घेतले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘मला मंत्रिपदावरून काढले तरी हरकत नाही, अशा संतप्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजचा प्रश्नोत्तराचा तास फक्त मुख्यमंत्र्यांचा…..!

X : @NalavadeAnant नागपूर एखाद्या अधिवेशनात आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या विभागांचा पूर्ण तब्बल एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास कधी वाट्याला आला असे आज तरी दिसून आलेले नाही. मात्र मंगळवारी येथे सूरू असलेल्या हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याच अखत्यारीतील विभागांचे तब्बल २२ प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई भाजपकडून “शंकेखोराचा कोथळा काढण्याचा” कार्यक्रम

Twitter : @NalavadeAnant मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानांचा वध करताना वापरलेल्या वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.  […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा-कुणबी प्रमाणपत्र समिती मराठवाडा दौऱ्यावर

Twitter : @NalavadeAnant मुंबई  मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समिती सदस्य हे ११ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक […]