केजरीवालांची तिहार तुरुंगात रवानगी? आज होणार फैसला
नवी दिल्ली : कथित मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले आहे. हजेरीसाठी न्यायालयात जात असताना अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान जे काही करत आहेत ते देशासाठी चांगले नसल्याची भावना व्यक्त केली. केजरीवाल यांची अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी आज म्हणजेच १ एप्रिल रोजी संपत आहे. […]