धान उत्पादकांना न्याय हवा; चंद्रपूरला कृषी विद्यापीठाची मागणी — मुनगंटीवारांचे विधानसभेत सरकारला खडे बोल
नागपूर – “आपण पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य होतो… त्यामुळे शेतकऱ्यांप्रती भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,” अशी ठाम मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर करताना केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “चार दिवस विदर्भाचे मीठ खाल्ले… त्या मिठाला […]





