ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचं काय उत्तर ?

मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रचारात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत असून ठिकठिकाणी सभा घेतायेत. त्यातच संजय राऊत हेही प्रचारासाठी फिरताना दिसतायेत. यात ठाकरे आणि राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांची तुलना औरंगजेबाशी केलीय. त्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर दिलंय. काय म्हणालेत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीतील वर्चस्व संपवण्यासाठी ‘पवारां’विरोधात महायुतीच्या नेत्यांची फिल्डिंग?

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. शरद पवार गटातूनही बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. अशावेळी बारामतीतील पवार विरूद्ध पवार लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना विजय शिवतारेंच्या एन्ट्रीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय पदार्पणात अनेक विरोधाला […]

ताज्या बातम्या मुंबई

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना हटवण्यास शिंदे सरकारचा नकार? आदित्य ठाकरेंचा नवा आरोप

मुंबई- मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मात्र आयुक्तांवर शिं सरकारचं प्रेम असल्याचं सांगत, आयुक्तांच्या बदलीला सरकारनं नकार दिल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. आयुक्त इक्बाल चहल यांनी बदली मुख्यमंत्री कार्यालयात होईल की त्यांना दिल्लीत पाठवण्यात येईल, असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. काय म्हणालेत आदित्य ठाकरे? आयुक्तांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसेच्या एन्ट्रीमुळे महायुतीचं जागावाटप आणखी लांबणीवर? उद्यापर्यंत उमेदवार निश्चित होणार

मुंबई- निवडणुका जाहीर झाल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला दिसत नाहीये. भाजपानं राज्यातील २० उमेदवारांची दुसऱ्या यादीत घोषणा केली असली तरी इतर महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत, त्यातच आता मनसे महायुतीत येणार असल्यानं काही जागांचे संदर्भ बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. जागावाटप आणखी रखडणार? महायुतीत शिंदेंची शिवसेना आण अजित पवार राष्ट्रवादीला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राज ठाकरे यांची अमित शाहांशी अर्धा तास चर्चा, मनसे महायुतीत येण्याच्या घडामोडींना वेग, निर्णय कधी जाहीर होणार?

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर या भेटीबाबत आणि महायुतीत सहभागी होण्याबाबत निर्णय ते जाहीर करण्याची […]

ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

प्रिया दत्तही शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? मुंबईच्या या मतदारसंघातून तिकिट मिळणार असल्याची चर्चा

मुंबई- एकीकडे राज ठाकरे दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेलेले असताना, दुसरी एक मोठी राजकीय घडामोड मुंबईत घडताना पाहायला मिळतेय. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता प्रिया दत्तही महायुतीत सामील होतात का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. प्रिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष? राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद किती वाढणार?

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत असून त्यांची आज भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज ठाकरे यांची भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक पाहायला मिळत होती. यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्यास याचा महायुतीला लाभ होण्याची शक्यता […]

ताज्या बातम्या मुंबई

काही तासांतच मनसे महायुतीत जाणार की नाही ते स्पष्ट होईल, संदीप देशपांडेंनी काय दिलेत संकेत?

मुंबई– मनसे महायुतीत जाणार की नाही, याबाबतची स्पष्टता काही तासांत येईल, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलंय. राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत, ते काही तासांत त्यांची भूमिका मांडतील, त्यातून सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही संदीप देशपांडे म्हणालेले आहेत. बाळा नांदगावकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत गेले तर आनंदच होईल, असंही देशपांडे यांनी […]

ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

इलेक्टोरल बाँड प्रकरणाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद? भाजपासह इंडिया आघाडीतील पक्षही अडचणीत? सुप्रीम कोर्टानं एसबीआयला काय दिलेत निर्देश?

नवी दिल्ली – इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वाधिक निधी भाजपाला मिळालय आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र या बाँडचे लाभार्थी हे इतर राजकीय पक्षही आहेत. हे खंडणीचं रॅकेट असल्याचा आरोप करणाऱ्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमकेला मिळालेल्या 509 कोटींचा निधी वादात सापडलाय. लॉटरी किंग सँटियागो मार्टिनच्या फ्यूचर गेमिंगकडून हे 509 कोटी मिळाल्याचं समोर आलंय. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

राज ठाकरे महायुतीत आले तर कुणाला फायदा? मनसेच्या वाट्याला काय?

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मनसे दाखल होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नवी दिल्लीत पोहचले आहेत. गेल्या काही काळापासून राज ठाकरे महायुतीसोबत येतील, अशी चर्चा रंगली होती. याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा […]