महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेसचा भर…!

हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर भूमिका मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा लढवण्यावर भर देणार असून ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठीची लढाई आहे, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (MPCC President Harshwardhan Sapkal) यांनी केले. त्यांनी महायुतीतील (Mahayuti) कोणत्याही पक्षाशी आघाडी न करण्याचाही ठाम निर्णय व्यक्त केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये असंतोष […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

दहशतवादाचा चेहरा बदलला, पण आता भारतही बदलला — काँग्रेसच्या दुर्बलतेवर मोदींचा प्रतिआघात

व्हाईट-कॉलर जिहाद’पासून लाल किल्ल्याच्या कटापर्यंत — भारत आता केवळ बचाव करत नाही, प्रत्युत्तर देतो. नवी दिल्ली: भारतावरील दहशतवादी धोक्याचे स्वरूप बदलले आहे—रस्त्यावरचा अतिरेकीच नव्हे, तर “व्हाईट-कॉलर” नेटवर्क, एन्क्रिप्टेड चॅट्स आणि सायबर सावल्यांतून चालणारी यंत्रणा. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दशकांच्या राजकीय प्रतिसादांची तूलना केली तर चित्र स्पष्ट दिसते: काँग्रेसच्या काळातील तुष्टीकरण, शिथिल तपास यंत्रणा आणि दिशाभूल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेबरोबर युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही — हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर (मनसे) संभाव्य युतीबाबत सुरू झालेल्या चर्चांवर अखेर काँग्रेसने अधिकृत खुलासा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, “मनसेसोबत युती किंवा आघाडीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमधील आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने अधिकृतपणे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

“मतचोरी”चा आरोप ठरला फोल: राहुल गांधींच्या विधानांमागील तथ्यांचा सविस्तर मागोवा

भारतीय निवडणूक प्रक्रियेवर केलेल्या खोट्या आरोपांवर तथ्याधारित उत्तर नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की हरियाणासह देशातील निवडणुका “चोरल्या गेल्या.” हा आरोप केवळ तथ्यहीन नाही, तर देशातील निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर जनतेचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रत्येक दाव्याचा वेध घेतला असता, आकडे आणि पुरावे स्वतःच त्यांच्या विधानांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मतचोरीतही भाजपाला हिंदू-मुस्लीम दिसते; त्यांच्या बुद्धीची किव करावी वाटते — हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने मतचोरी करून सत्ता मिळवली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. “मतचोरीसारख्या गंभीर मुद्द्यातही भाजपाला हिंदू-मुस्लीमच दिसते; त्यांची ही मानसिकता पाहून दया वाटते,” अशी टीका त्यांनी केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “मतचोरीचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेस व राहुल गांधींनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nathuram Godse : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना ‘नथुराम गोडसे’ची धमकी; जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सत्यजीत तांबे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्रातील संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना ‘तुमचा नथुराम गोडसे करू का?’ अशी धमकी एका तथाकथित कीर्तनकाराने व्हिडिओद्वारे दिली. या घटनेने संतपरंपरेच्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Housing Jihad : मुंबईत हाऊसिंग जिहादचा आरोप; उद्धव ठाकरे, काँग्रेसवर संजय निरुपम यांची टीका

मुंबई : शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Shiv Sena leader Sanjay Nirupam) यांनी जोगेश्वरीतील दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांत (SRA projects) हिंदूंची घरे मुस्लिमांना देण्याचे कटकारस्थान रचल्याचा आरोप बिल्डरांवर केला. हाऊसिंग जिहादच्या (Housing Jihad) माध्यमातून मुंबईची (Mumbai) डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. निरुपम यांनी सांगितले की, ओशिवरा येथील पॅराडाइज झोनमध्ये ४४ घरे ९५ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकशाहीचे रक्षण व मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसचे आंदोलन: नाना पटोले

मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांचा निषेध करत, लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली. पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर फक्त सहा महिन्यांत ५० लाख नवे मतदार कसे आले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर ७६ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड

मुंबई : भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे केलेले विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर थेट हल्लाच असून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्वांशी केलेला हा विश्वासघात आहे. त्यामुळे भाजप नितेश राणेंच्या विखारी आणि विभाजनकारी वक्तव्यांचे समर्थन करते का?असा संतप्त सवाल करत, असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंची महायुती सरकारच्या नेत्यांनी […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अवमान केल्याच्या प्रकरणावर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’ काढून भाजपा आणि अमित […]