ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा हुकमी एक्का रिंगणात ; साताऱ्यात उदयनराजें विरुद्ध शशिकांत शिंदे लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावावर अखेर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविरोधात शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जालन्यात तिसऱ्यांदा रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे यांच्यात सामना रंगणार

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) विरुद्ध कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्यात सामना रंगणार आहे. महायुतिकडून या मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) काँग्रेसकडून काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे निवडणूक लढण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘आमचे काय चुकले, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात’ ; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल

मुंबई : महाविकास आघाडीच्या झालेल्या बेठकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha )जागेचा तिढा अखेर सुटला आहे . सांगलीची जागा काँग्रेस ऐवजी शिवसेना ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे . त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) नाराजी पसरली आहे . या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असणारे विशाल पाटील (Vishal Prakashbapu Patil) यांचे कार्यकर्ते आघाडीच्या या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसला खिंडार ; राजू वाघमारें यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला (Congress) धक्यावर धक्के बसत आहेत . काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणारे पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी पक्षाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश (CM Eknath Shinde Shivsena )केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे . राजू वाघमारे हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळत होते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत काँग्रेसला धक्का ; ठाकरेंचा शिलेदारच लोकसभा निवडणूक लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha) जागेवरून सुरु असलेला वाद आज संपला आहे . या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray )यांचा शिलेदारच निवडणूक लढणार असल्याचे आज निश्चित झाले आहे . या मतदारसंघात त्यांच्याकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil )यांना उमेदवारी देण्यात आली आहे . आज महाविकास आघाडीची संयुक्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

देशात पहिल्या टप्प्यात किती उमेदवार रिंगणात? किती उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी?

नवी दिल्ली- लोकसभा निवडमुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. या टप्प्यात 21 राज्यांतील 102 जागांसाठी एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत. यातील एकूण 26 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले असल्याची धक्कादायक माहिती आहे. यातील 16 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर 10 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. एकूण उमेदवार- 1618गुन्हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे कारण?

मुंबई – लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता राज्यात सुरु आहे. अशा स्थितीतही मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्याचा वार राजकीय बैठकांसाठी होत असल्यानं याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी विचारणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना याबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

राज ठाकरे महायुतीसोबत गुढी उभारणार? राज ठाकरे किती वाजता भाषणाला उभे राहणार? शिवाजी पार्कच्या सभेकडे राज्याचं लक्ष

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अमित शाहा यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट घेतल्यानंतर, राज ठाकरे आज महायुतीसोबत जाणार का, याचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळं राज ठाकरे आज शिवाजी पार्कवर काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष असेल. शिवाजी पार्कच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. 70 हजार […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

सांगलीबाबत सोनिया गांधींचा सल्ला उद्धव ठाकरे ऐकणार का? शरद पवारांकडे काय दिलाय निरोप?

मुंबई- महाविकास आघाडीतील सांगली, भिवंडीचा तिढा सुटताना दिसत नाहीये. सांगलीतून उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या जिव्हारी लागलेली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढवावी अशी जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांची इच्छा होती. यावरुन मविआत वादंग निर्माण झालेला आहे. गुढीपाडव्याला आज मविआतील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसने देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलंय ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा घणाघात

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे . आज चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी काँग्रेसने (Congress) प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे . ‘काँग्रेसने ५० वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत. तेवढी कामं मोदींच्या काळात झाली हा इतिहास […]