मुंबई : काँग्रेसची चौथी यादी समोर आली असून यामध्ये दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये जालना आणि धुळे लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून १५ जागांवरुन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईतील दोन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई मध्य या मतदारसंघातील उमेदवारांची नावं अद्यापही गुलदस्त्यात आहेत.
चौथ्या यादीनुसार, काँग्रेसकडून जालन्यातून कल्याण काळे तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. कल्याण काळे यांना रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार आहेत.
काँग्रेसची आतापर्यंतचे उमेदवार आणि मतदारसंघ..
1 सोलापूर – प्रणिती शिंदे
2 कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
3 पुणे – रवींद्र धंगेकर
4 नंदुरबार – गोवाल पाडवी
5 अमरावती – वळवंत वानखेडे
6 लातूर – डॉ. शिवाजी कलगे
7 नांदेड – वसंतराव चव्हाण
8 रामटेक – रश्मी बर्वे
9 भंडारा-गोंदिया – प्रशांत पडोळे
10 नागपूर – विकास ठाकरे
11 गडचिरोली – नामदेव किरसान
12 सोलापूर- प्रणिती शिंदे
13 जालना – कल्याण काळे
14 धुळे – डॉ. शोभा बच्छाव
15 अकोला – अभय पाटील
hsrgqeivrd
April 10, 2024Muchas gracias. ?Como puedo iniciar sesion?