मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी गुडीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षातून धक्यावर धक्के बसत आहेत . त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी पसरली आहे . याआधी मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता डोंबिवलीतील (Dombivli) मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते (mihir dawte) यांच्यासह सात जणांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा दिल्याचे मिहिर दवते यांनी सांगितलं आहे. मनसेच्या सोशल मिडिया ग्रुपवर राजीनामा दिला आहे.त्यामुळे आता राज ठाकरेंनी भाजपला पाठींबा देताच मनसेमध्ये मोठे खिंडार पडले आहे .
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदल्यात भूमिकेमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या बदल्यात भूमिकेमुळे मतदारांसमोर जाणे अवघड होते. त्यामुळे आम्ही पक्षाचे काम थांबवत आहोत असे दवते यांनी सांगितले आहे .त्यानंतर ड्वते शिवसेना शिंदे गट किंवा ठाकरे गटात जाऊ शकतात, अशा चर्चाना डोंबिवलीत उधाण आले होते .. याबाबत मिहीर यांनी सांगितले की, सध्या मी कुठल्या पक्षात जाईल, याचा निर्णय मी घेतलेला नाही, सध्यातरी राजकारणाला आमचा विराम असेल. राज साहेबांनी आम्हाला राजकारणात ओळख दिली. पण त्याच बरोबर २०१० साली झालेल्या केडीएमसी महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतर आम्ही सुद्धा काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर झुंज दिली असल्याचे त्यांनी सांगितले . .
दरम्यान दुसरीकडे राज ठाकरेंच्या भूमिकेवर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू ऊर्फ प्रमोद पाटील (Raju Patil) यांनीही सोशल मीडियाद्वारे ” उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है ” अशा आशयाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, विकसनशील ते विकसित भारतापर्यंतचा झालेला बदल इथपासून ते देशांतील विरोधकांची अवस्था अशा सर्व मुद्द्यांवर परखड मते मांडली आहेत.