ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पक्ष प्रवेश तर झाला पण भाजप अंगवळणी पडायला वेळच लागेल, अशोक चव्हाणांच्या तोंडी काँग्रेसच नाव

मुंबई आज अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. भाजपच्या प्रवेशानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण अडखळल्याचं दिसून आलं. पक्षप्रवेशानंतर चव्हाणांनी बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख केला. त्यानंतर आशिष शेलार यांचा उल्लेख करताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अखेर अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला, वाजतगाजत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आणि म्हणूनच घरात वारसा असल्याने बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचे जुने व्हिडीओ ट्रेंडमध्ये! विरोधकांनी घेरलं!

मुंबई अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याने आता देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. विरोधकांकडून फडणवीसांचे जुने व्हिडीओ समोर आणले जात आहेत. यात एकेकाळी देवेंद्र फडणवीसांनी आदर्श घोटाळ्यावरुन अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं होतं. आज त्यांचाच भाजप प्रवेश होत असल्याने भाजपवर बोट ठेवलं जात आहे. आदर्श घोटाळा आणि सिंचन घोटाळा कसा झाला यावर बोलतानाचा देवेंद्र फडणवीसांचा एक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार, उद्या राज्यसभेचा अर्जही भरणार!

मुंबई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तासात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज दुपारी १२.३० वाजता पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आता अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का?’

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांची मूट बांधण्याचं काम सुरू असताना पक्षांमधील Out Going थांबवणं अशक्य होत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. यावर आता संजय राऊतांनी भीती वाढवणारी शक्यता व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे आता अशोक चव्हाणदेखील काँग्रेसवर दावा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्वजीत कदमदेखील काँग्रेस सोडणार? Video मधून दिली महत्त्वाची माहिती

सांगली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसमधून राजीनामा दिला. या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चव्हाणांनी पक्ष सोडण्याचं नेमकं कारण अद्याप जाहीर केलंलं नाही. दरम्यान त्यांच्यासोबत ११ आमदार पक्षाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते पंतगराव कदम यांचे सुपूत्र विश्वजीत कदम यांचंही नाव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही…’, काँग्रेसच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी इतक्या वर्षांच्या कामानंतर काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. निवडणुका तोंडावर असताना चव्हाणांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजीनाम्यानंतर पहिल्यांदा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मला पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही आणि कोणाची उणीदुणी काढायची नाही. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आगे आगे देखीये होता है क्या’; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

मुंबई लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना काँग्रेसला मोठं खिंडार पडताना दिसत आहे. काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. असं असताना चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठे संकेत दिले. काँग्रेसचे मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘दाढी रावणाला होती, रामाला नाही’; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची खरमरीत टीका

मुंबई ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं वक्तव्य काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली आहे. ‘लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. यासाठी एकनाथ शिंदेंना रामायण, महाभारत वाचावं लागेल’ अशा शब्दात संजय राऊतांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अभिषेकला विश्वासघाताने संपवले, आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा

विनोद घोसाळकर यांचे निवेदन माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा, […]