महाराष्ट्र

घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे नेमके काय झाले? : कॉँग्रेसचा सवाल 

X : @therajkaran मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले, पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आजचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, विशेष अधिवेशनाचा केवळ फार्स’; विरोधकांचं टीकास्त्र

मुंबई आज विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले असले तरी न्यायालयात हे आरक्षण टिकणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यापुर्वी दोन वेळा निवडणुकीच्या तोंडावर असाच प्रयत्न झाला होता. मराठा समाज मागास असण्याला आधार काय? मागास आयोगाने घाईघाईत केलेलं सर्व्हेक्षण, १० टक्के आरक्षणाच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह, ५० टक्क्यांहून अधिकच आरक्षण कोर्टात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उ. महाराष्ट्रात महायुतीत जागांची अदलाबदल, कोण कुठल्या मतदारसंघातून लढणार?

नाशिक आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना १० जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अनेक मतदारसंघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. यात नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद कशासाठी? मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे मराठा सर्व्हेक्षणाचा अहवाल सुपूर्द केला होता. आजच्या अधिवेशनात त्यावर चर्चा केली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालात यासंबंधित मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. त्याचा घेतलेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीचं जागावाटप ठरलं, कुणाला फायदा, कुणाला नुकसान, भाजप नेमक्या किती जागांवर लढणार?

मुंबई लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्यांचं लक्ष असलेल्या महायुतीचं जागावाटप निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीत भाजप ३२ जागा लढणार असल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना १० जागांवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी ६ जागावंर लढणार आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्कामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेत कमी जागा मिळाल्याचं दिसतंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठ्यांचं स्वप्न पूर्ण होणार? मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन

मुंबई राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे. अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार असल्याने कुणबी एकत्रीकरण समिती आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनावरुन काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहेत. मागासवर्ग आयोगाने राज्यभरात मराठा समाजाचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी महाराजांची 394 वी जयंती, शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शासकीय सोहळ्याचं आयोजन

शिवनेरी आज १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सध्या राज्यभरातील वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथील शिवाजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रत्नागिरी, पालघर आणि दक्षिण मुंबई मतदारसंघात भाजपचा उमेदवार? शिंदे गटाच्या दाव्याचं काय?

मुंबई गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिंकलेल्या मतदारसंघाच्या जागा महायुतीत शिंदे गटाकडे कायम राहिल असा दावा पक्षाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वेगळ चित्र दिसून येत आहे. दक्षिण मुंबईगेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले होते. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते दक्षिण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई मराठा आरक्षणाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षणाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. आज मागासवर्ग आयोगाकडून तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. आज मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपुर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस सोडणाऱ्यांना जनताही स्वीकारणार नाही, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचा संताप!

मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल यांनी संताप व्यक्त केला. अशोक चव्हाणांनंतर एकही व्यक्ती काँग्रेस सोडून जाणार नाही. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना जनताही स्वीकारणार नाही. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडलं, याचं त्यांच्याकडे काहीच कारण नाही. काँग्रेसची नीती चुकीची आहे […]