मुंबई
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे.
अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार असल्याने कुणबी एकत्रीकरण समिती आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनावरुन काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहेत.
मागासवर्ग आयोगाने राज्यभरात मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे. आजच्य अधिवेशनात या अहवालावर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सटारीतून राज्य सरकारला इशारा दिला आहे. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास आगामी काळात मोठं मराठा आंदोलन उभे करणार असं पाटील म्हणाले.