ताज्या बातम्या महाराष्ट्र

“यांच्या” बोलण्या, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही! : आशिष शेलार

X : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन.. सावधान.!! युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके” आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला आमदार अँड आशिष शेलार यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘मोदी-शाहांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे’

मुंबई केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंविधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran मुंबई राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलेल्या पत्रातील माहिती खोटी; गृहविभागाकडून स्पष्टीकरण

मुंबई राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. त्यात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडे एप्रिल 2023 पासून डीएनए किट्स उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. ही माहिती संपूर्णपणे खोटी असून, याबाबत गृहविभागाकडून खालीलप्रमाणे वस्तुस्थिती दिली जात आहे. 1) न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही गृह विभागांतर्गत काम करते आणि मुंबईसह एकूण 8 ठिकाणी डीएनए […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नववर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी द्यावी, फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?

मुंबई नागपूर विमानतळावर आज सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी फडणवीसांना नव्या वर्षाच्या टार्गेटसंदर्भात विचारलं. आधी फडणवीसांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, नवं वर्ष सर्वांना सुख-समाधानाचे जावो, हीच अपेक्षा. खरं म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा असतात त्याच आमच्याही असतात. त्यामुळे नव्या वर्षात जनतेला त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करता याव्यात, ही ईश्वरचरणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मुदतवाढ नाहीच; नितीन करीर यांना लॉटरी

By Anant Nalavade  X : @NalavadeAnant मुंबई येत्या ३१ डिसेंबरला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ म्हणजेच लोकसभा निवडणुकीपर्यंत द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठविला आहे. असे जरी असले तरी केंद्र सरकार त्याला अनुकूल नसल्याची खात्रीलायक माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.   […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मकरसंक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे एकत्र मेळावे, महायुतीचं शक्तिप्रदर्शन

मुंबई येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना महायुतीने मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असताना महायुतीचे एकत्रितपणे मेळावे घेतले जाणार आहेत. १४ जानेवारी रोजी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवार, शिंदे गट भाजपात जाणार : संजय राऊत यांचा दावा

X: @NalavadeAnant मुंबई: काही ना काही तरी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे वादग्रस्त व्यक्तिमत्व व ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले. हे दोघेही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात प्रवेश करतील असा काहीसा धक्कादायक व खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

शरद पवार आणि उद्धव ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार की नाही?

मुंबई 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोमात सुरू आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो लोक अयोध्येत एकत्र येणार आहेत. दरम्यान या सोहळ्याला उबाठा गटाचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवलं नसल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे पॉलिटिकल इव्हेंट संपल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन […]

devendra fadnavis मुंबई ताज्या बातम्या

कोळीवाड्यातील सदनिकांचा म्हाडा करणार पुनर्विकास: देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील सर्व प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. गृहनिर्माण विभागाच्या विविध विषयासंदर्भात तसेच PMAY योजनेच्या अंमलबजावणीबाबत  सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली.   मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करावा, तसेच सायन – कोळीवाडा येथील 1200 सदनिकांचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी […]