बिबट्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी–अधिकारी संयुक्त बैठक; मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले : वनमंत्री गणेश नाईक
नागपूर: राज्यातील मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी सरकार गंभीर असून, भविष्यात एकही मनुष्य बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडू नये यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ज्या विभागात बिबट्यांचा त्रास वाढला आहे, तेथे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार […]

