महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुधाला ५ रु. प्रति लिटर अनुदान, रेशीम उद्योग विकासांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारने जाहीर केला मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या विषयांवर निर्णय सुनावला आहे. याबाबत मंत्रिमंडळाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचं शिंदेंनी घोषित केलं आहे. याशिवाय मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता, रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वर्षा निवासस्थानी खलबतं, राज ठाकरे अचानक ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटीलही होते. राज ठाकरेंचं टोलचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेने मराठी पाट्यांचं आंदोलन हाती घेतलं आहे. राज्यभरात दुकानदारांनी मराठी […]

महाराष्ट्र जिल्हे

महाड : अवैद्य धंद्यांना राजकीय वरदहस्त कोणाचा ? मनसेचा सवाल

Twitter : @MilindMane70 महाड रायगड जिल्ह्यातील महाड शहर हे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीत कोणत्याही बेकायदेशीर व अवैध धंद्यांना मोकळीक दिली जाऊ नये, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार हे धंदे काही काळ बंद ठेवण्यात आले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांसह वडेट्टीवारांचा विरोध

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच या मागणीला आता विरोध सुरू झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ तसेच कुणबी सेनेची विरोधाची भूमिका या निमित्ताने समोर आली आहे. मराठा आरक्षणावर जालना येथील आंदोलन अधिक तीव्र झाले असताना आंदोलकांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र […]