महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन पक्ष फोडूनही भाजप पिछाडीवर!

X: @vivekbhavsar मुंबई: आजपासून 12हा 13 वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2012 च्या आसपास नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झालेला होता. समाज माध्यमांचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची विकास पुरुष आणि गुजरातचे विकास मॉडेल हे देशभर लोकांच्या मनात रुजवले होते. मोदींबद्दल एक अपेक्षा आणि आशा निर्माण झाली होती. त्यातूनच पुढे 2014 च्या […]

महाराष्ट्र

महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍या आठ पदाधिकाऱ्यांचे निलंबन : सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतली शिवाय महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. आज निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यां मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती देणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल करा : कांग्रेस

मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक,तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भाजपने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या असल्या तरी वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत.असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर एफआयआरही दाखल करावा,अशी मागणी केल्याचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बहन मायावतींची पुण्यात ‘महासभा’!

‘बसपा’चा निळा झेंडा यंदा विधानसभेत झळकणार-डॉ.हुलगेश चलवादी शोषित,पीडित, उपेक्षितांना यंदा कायदेमंडळात नेतृत्व मिळेल पुणे: समाजातील शोषित, पीडित, उपेक्षितांना नेतृत्व देवून त्यांना शासनकर्ती जमात करण्याचे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवंगत कांशीराम आयुष्यभर झटले. बहुजन समाज पक्षाने तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी – आशिष शेलार

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉँग्रेसने मुंबईत जे अकरा उमेदवार दिले आहेत त्यातील केवळ दोनच उमेदवार मराठी आहेत. इतका पराकोटीचा मराठीद्वेष दाखवणाऱ्या कॉँग्रेसबद्दल आपली भूमिका काय आहे, हे स्पष्ट करा, असे आव्हान मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना सोमवारी दिले. भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. शेलार बोलत होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर काढले अन्यथा १५ वर्ष ते प्रकल्प पूर्ण झाले नसते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका

विकास आणि कल्याणकारी योजना हा आमचा अजेंडा   मुंबई: कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो ३, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले अन्यथा १५ वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या वरळीमधील निवडणूक कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अन्नमित्रने शेकडो गरीबांची दिवाळी केली गोड 

मुंबई: नेहमीच गरीब गरजू आणि भुकेल्यांना आपुलकीचे आणि प्रेमाचे दोन घास देणार्‍या सौरभ मित्र मंडळाच्या ‘अन्नमित्र’ सत्कार्याने टाटा रुग्णालय परिसरात ३०० गरीब, गरजूंसह कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली.  सौरभ मित्र मंडळाच्या अन्नमित्र उपक्रमाच्या माध्यमातून गेली चार वर्षे केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या परिसरात गरीब, गरजू आणि भुकेल्यांना अन्नदान केले जात […]

महाराष्ट्र

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्याचे शरद पवार यांचे संकेत 

इंदापूर (पुणे): निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेने मला 14 वेळा निवडून दिले. त्यातल्या सात वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेने मला मतं दिली. त्यामुळे आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलायचं आहे. हे करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता […]

महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : सांस्कृतिक मंत्र्यांचे आवाहन 

X : @NalawadeAnant मुंबई – आमचे सरकार नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलत होते.  ते म्हणाले, मुंबई, कोल्हापूरप्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा १५० एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले गुंतवणूकदार आणि पंतप्रधानांचे आभार X : @therajkaran मुंबई राज्यातून उद्योग बाहेरील राज्य खासकरून गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचा खोटा प्रचार (False Narrative) विरोधी पक्ष करत असले आणि तसा चुकीचा नरेटिव्ह पसरवत असले तरी ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण परकिय गुंतवणुकीच्या (FDI) ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. हि अत्यंत आनंदाची बातमी आहे […]