Pankaja Munde speaking in Maharashtra Assembly on Mazi Vasundhara campaign and climate change initiatives महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ‘माझी वसुंधरा’ मोहीम वेगात; २०३५ पर्यंत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक, कर्करोग तपासणीला गती

मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून “माझी वसुंधरा” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील २८,३२८ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, सध्याचे दशक हे इतिहासातील सर्वात उष्ण दशक ठरत आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेले तापमान आणि वाढते कार्बन […]

Editorial illustration of corruption allegations inside a government vaccine laboratory in Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

हाफकिन घोटाळा: 65 कोटी खरेदी अनियमितता, बेकायदेशीर नियुक्त्या आणि शासनावर प्रश्नचिन्ह

मुंबई / पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्र शासनाचा अभिमान मानल्या जाणाऱ्या हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ (HBPCL) मध्ये गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराने अक्षरशः पाळेमुळे रोवली आहेत, असे गंभीर आरोप समोर येत आहेत. बेकायदेशीर नियुक्त्या, अपात्र अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) निष्कर्षांकडे केलेले दुर्लक्ष — या सर्व घडामोडींमुळे संस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. विधानसभा पावसाळी अधिवेशनातही या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule: कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: पुणे येथील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी नेमण्यात आलेल्या खारगे चौकशी समितीचा अहवाल अद्याप सीलबंद असून, त्याचे सविस्तर वाचन केल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुढील आठवड्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू होत असल्याने हा अहवाल अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करत बावनकुळे म्हणाले की, “हा अहवाल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबईकरांसाठी मोठी दिलासा योजना: ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – अनेक वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्याने आर्थिक, कायदेशीर आणि व्यवहारातील अडचणींना सामोरे जाणाऱ्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी राज्य सरकारने ‘सुधारित भोगवटा अभय योजना’ लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ही घोषणा करताना सांगितले की या निर्णयाचा थेट दहा लाखांहून अधिक मुंबईकरांना लाभ होणार आहे. विधानसभेत निवेदन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मुंबईला ‘पागडीमुक्त’ करण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; स्वतंत्र नियमावली येणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा

नागपूर – मुंबईला पागडीमुक्त करण्यासाठी आणि पागडी इमारतींचा न्याय्य, सुयोग्य आणि जलद पुनर्विकास करण्यासाठी शासन स्वतंत्र नियमावली तयार करत असल्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. “भाडेकरू आणि घरमालक — दोघांच्याही हक्कांचे संरक्षण केले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी सांगितले, मुंबईतील सुमारे १९,०००+ सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रक्रियेला गती; २५ हजार झोपडपट्ट्यांसाठी नवे धोरण — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर – मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनजागेवरील सुमारे २५ हजार झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने नवे धोरण तयार केले असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या धोरणामुळे उद्यानातील मौल्यवान वनक्षेत्र पुन्हा मोकळे होऊन संवर्धनाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितले की, उद्यानातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक — उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल.–2 आणि सी.एल.–3 परवानाधारक विदेशी व देशी दारूची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. आ. शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “संबंधित दुकान जर सोसायटीच्या हद्दीत असेल, तर त्या सोसायटीची […]

महाराष्ट्र

गुटखा विक्रेत्यांवरही मकोका लागू; कायदा अधिक कठोर करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

नागपूर – राज्यात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. परंतु सध्याच्या कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन आवश्यक घटकांचा अभाव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागात पारदर्शकतेचा ‘मेगा ड्राइव्ह’ सुरू…!

मुंबई: सर्वसामान्यांना महसूल विभाग ‘आपला’ वाटावा, कामकाज गतीमान व्हावे आणि अनियमिततेला आळा बसावा—या उद्देशाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागात मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता ‘मेगा ड्राइव्ह’ राबवला आहे. महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या तक्रारींची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर सात दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकासाठी जागा निवडीची प्रक्रिया सुरू : सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार

मुंबई — हिंदी पत्रकारितेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मौजे पराड येथे जागा निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्र्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने ७–८ दिवसांच्या आत जागा […]