मुंबई ताज्या बातम्या

Bombay Hight Court : हायकोर्टाचे नामकरण ‘मुंबई उच्च न्यायालय’ करा; सुनील प्रभू यांची मागणी

iमुंबई – बॉम्बे हायकोर्टचे नामांतर करून ते अधिकृतपणे ‘मुंबई उच्च न्यायालय’ असे घोषित करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी शिवसेना नेते आणि विधानसभा प्रतोद आ. सुनील प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. प्रभू यांनी आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विशेष शासकीय ठराव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निकाल लांबणीवर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तीव्र टीका

मुंबई — “निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लांबले आहेत. ज्या ठिकाणांचे निकाल प्रलंबित होते, तिथल्याच निवडणुका पुढे ढकलायला हव्या होत्या. पण आयोगाने चुकीच्या पद्धतीने व्यापक निर्णय घेतल्याने आता सर्वच निकालांवर परिणाम झाला,” अशा शब्दांत महसूलमंत्री आणि नागपूर–अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “राज्य सरकारने अनेकदा चर्चा केली, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sunil Tatkare : “दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करणे हा त्यांचा आयुष्यभराचा धंदा” — खा. सुनील तटकरे यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर झोड

By Nalawade मुंबई — “माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत आणि त्याच्याशी माझा दूरान्वये संबंध नाही. पण स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करत फिरायचं—हा त्यांचा आजपर्यंतचा धंदाच आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर जोरदार पलटवार केला. त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही […]

लेख

महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाचा गोंधळ आणि बरंच काही!

By: विक्रांत पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया, पण तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात याच पायाला पैशाच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा होण्याऐवजी, तो पैशांच्या खेळाचे, निवडणूक आयोगाच्या सावळा गोंधळाचे आणि न्यायालयीन गुंतागुंतीचे एक मोठे प्रदर्शन ठरत आहे. एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा अक्षरशः […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देवाभाऊची आर्थिक शिस्त आणि शिवसेनेला उतरती कळा 

X:  @vivekbhavsar राज्यात मंगळवारी नगरपालिका आणि नगर पंचायतसाठी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महापालिका निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील वर्षात 31 जानेवारीअखेर सर्व शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकिया संपवून लोकनियुक्त प्रतिनिधीच्या हातात कारभार जाणे सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत आहे, तसा आदेश आहे. कुठलीही स्थानिक स्वराज्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“या निवडणुकीत फक्त पैशांचा पूर नव्हे तर अतिवृष्टीचे दर्शन!”: उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर तोफेची झोड

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यभर तापवला असताना, प्रचाराला अवघे पाच दिवस शिल्लक असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे खास पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर ठाकरी शैलीत जोरदार हल्ला चढवला. “सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री एकमेकांवर आरोपांची फेकाफेक करत राज्यभर आपलेच वाभाडे काढत आहेत. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रवादी–भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी प्रवीण दरेकर महाडमध्ये; प्रचाराला वेग

महाड — ऐतिहासिक महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीमुळे प्रचाराला रंगत आली असून, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर दोन दिवस महाडमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे महाडमधील निवडणूक प्रचाराला मोठी गती मिळणार असल्याची चर्चा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘IIT Bombay’ म्हटले तर ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न!’ — राज ठाकरे यांचा भाजपवर आरोप

मुंबई — केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘IIT Bombay’ संदर्भात केलेल्या विधानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आयआयटीच्या नावात “मुंबई” न ठेवता “बॉम्बे” ठेवणे योग्य ठरले’ या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याला ठाकरे यांनी “मुंबईला महाराष्ट्रापासून दूर नेण्याचा प्रयत्न” असे संबोधत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर गंभीर आरोप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर व्हायचे ते झाले… शरद पवार ठाकरे बंधूंसोबत!

मुंबई– मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला आज स्पष्ट फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रातील बैठकीत थेट घोषणा करत आपला पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने अलीकडेच ’मनसे नको’ अशी अट ठेवत महाविकास आघाडीचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अ..ब…ब… काँग्रेसच्या आमदाराची थेट मंत्र्यालाच ‘संपवण्याची’ धमकी?”

मुंबई – 2021 पासून भाजप–शिंदे युतीचे सरकार आल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करतात, मात्र वास्तव याच्या पूर्ण उलट असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे—काँग्रेसच्या एका आमदाराने थेट भाजपच्या मंत्र्याला कुटुंबासहित “संपवण्याची” दिलेली कथित धमकी! घटना मालाड–मालवणी […]