ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपाला 370 चा आकडा गाठण शक्य नाहीय, ; राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरांचा दावा

मुंबई : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे . आतापर्यंत देशात पाच टप्प्यांच मतदान झालय. अजून मतदानाचे दोन फेर बाकी आहेत. देशात भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये सामना आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे. या पाच टप्प्याच्या मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; स्मृती इराणी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या(Lok Sabha Elections 2024) पाचव्या टप्प्यासाठी 49 जागांवर आज सकाळपासून मतदान (Voting) सुरू झालं आहे. या टप्प्यात 8.95 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पाचव्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या पाच केंद्रीय मंत्र्यांचं भविष्य ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही मतदारांच्या कसोटीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात संरक्षण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

थोरल्या पवारांना निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल ; वळसे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

मुंबई : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यादरम्यान अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil )यांनी केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेत आलं आहे . त्यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पैशाचा पाऊस ; शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा?; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे . यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde) यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतात. त्यांच्या संरक्षकांच्या हातात बॅगा देखील आहेत असे म्हणत .या निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

नंदुरबार : काँग्रेस भाजपकडून “इंदिरा माय” चा मतदारसंघ पुन्हा हिरावून घेणार का?

मुंबई महाराष्ट्रातील क्रमांक एकचा मतदारसंघ अशी शासकीय दप्तरी नोंद असलेल्या नंदुरबार या आदिवासी मतदारसंघातून (Nandurbar, Tribal Lok Sabha constituency) प्रचाराची सुरुवात करणाऱ्या दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या पाठीशी इथला आदिवासी कायम उभा राहिला. नंदुरबार मधून प्रचाराची सुरुवात म्हणजे देशात काँग्रेस चे सरकार येणार असे समीकरण तयार झालं होते. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान ; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला !

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे . राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ या ११ मतदारसंघांत आज मतदान होत आहे . आज सकाळी सातपासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात सकाळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा राजकारणाला रामराम !

मुंबई : जळगावच्या राजकारणातील मोठे नेतृत्व असणारे माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain)यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती . मात्र आता त्यांनी राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहोत. वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल मैदानात ; पत्रकार परिषेदसह रोड शोचं प्लॅनिंग !

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर तब्बल ५० दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळताच ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जोमाने तयारीला लागले आहेत . आज केजरीवाल हे कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम आदमी पक्षाच्या […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात भाजपच्या नेत्यांची मध्यरात्री बैठक ; आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काल मध्यरात्री भाजपच्या (bjp )नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाबाबत महत्वाची चर्चाही करण्यात आली. आगामी टप्प्यातील मतदानाच्या दृष्टिकोनातून पक्षाचे धोरण, मतदानाची घसरलेली टक्केवारी याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएसएसचे समन्वयक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या पुण्यात तोफ धडाडणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठींबा दिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांची तोफ उद्या पुण्यात (pune )धडाडणार आहे .भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ त्यांची उद्या पुण्यातील सारसबाग परिसरात सायंकाळी 6 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या आधी त्यांच्या सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि […]