मुंबई : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे . आतापर्यंत देशात पाच टप्प्यांच मतदान झालय. अजून मतदानाचे दोन फेर बाकी आहेत. देशात भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये सामना आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे. या पाच टप्प्याच्या मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत . अशातच आता राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आगामी लोकसभेबाबत अंदाज वर्तवले आहेत . या निवडणुकीत भाजपाकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. पण प्रत्यक्षात भाजपाला 300 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे ., त्यांना या निवडणुकीत ३७० चा आकडा गाठणं शक्य नाही पण ते 270 च्या खाली सुद्धा जाणार नाहीत” असंही ते म्हणाले आहेत .
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले , महाराष्ट्रात 20-25 जागा आम्ही जिकूं असं विरोधी पक्षाला वाटत आहेत . मात्र त्यांनी 25 जागा जिंकल्या, तरी त्यामुळे भाजपाच काही विशेष नुकसान होणार नाही. वर्तमान स्थितीत, महाराष्ट्रात भाजपाकडे 48 पैकी 23 च खासदार आहेत. अशावेळी महाराष्ट्रात मविआने जास्त जागा जिंकल्या तरी त्यामुळे भाजपाला विशेष नुकसान होणार नाही असे ते म्हणाले आहेत . दरम्यान भाजपविरोधात उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीने येत्या 4 जून नंतर आम्ही सरकार स्थापन करु असा दावा केला आहे. त्याचवेळी आम्ही आताच बहुमताच्या 272 च्या आकड्याच्या पुढे आहोत, असा भाजपाकडून दावा करण्यात येत आहे मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ही घोषणाबाजी आहे असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे
दरम्यान या निवडणुकीत भाजपाला यूपी आणि बिहारमध्ये 20 जागांवर फटका बसेल. पण त्यामुळे भाजपाचा फार नुकसान होणार नाही. 2019 मध्ये भाजपाने 18 जागा गमावल्या होत्या . पण त्यावेळी सपा आणि बसपा एकत्र लढल्यामुळे भाजपाच्या जागा 73 वरुन 62 वर आल्या होत्या. विरोधी पक्षाच मत आहे की, यावेळी सुद्धा बंगालमध्ये त्यांनी आपल्या जागा वाढवल्या या सर्व मुद्यांकडे प्रशांत किशोर यांनी लक्ष वेधलं आहे .