मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर आता सहाव्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काँग्रेसवर( congress )घराणेशाही, भ्रष्टाचार तसेच मुस्लिम आरक्षणावरून जोरदार टीका करत आहेत . या पार्शवभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत खळबळ उडवून दिली आहे . भाजप (bjp )सरकारच्या काळात सर्वात मोठा कोळसा घोटाळा झाला, असा आरोप केला आहे .तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदानी यांनी तिप्पट किमतीत कोळश्याची विक्री केली असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
भाजप सरकारमध्ये मोठा कोळसा घोटाळा उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या घोटाळ्यातून मोदीजींचे प्रिय मित्र अदानी यांनी कमी दर्जाचा कोळसा तिप्पट किमतीत विकून हजारो कोटी रुपयांची लूट केली आहे, ज्याची किंमत सर्वसामान्य जनतेने महागडी वीज बिले भरून स्वतःच्या खिशातून चुकवली आहे”, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.”या उघड भ्रष्टाचारावर ईडी, सीबीआय आणि आयटी गप्प बसण्यासाठी किती टेम्पो वापरले गेले हे पंतप्रधान सांगतील का? ४ जूननंतर, भारत सरकार या मेगा घोटाळ्याची चौकशी करेल आणि जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब देईल”, असा इशाराही राहुल गांधी यांनी आपल्या पोस्ट मध्ये दिला आहे.या निवडणुकीत देशातील मतदार भाजपला धडा शिकवणार, असा दावाही त्यांनी केला आहे. ४ जूननंतर, भारत सरकार या मेगा घोटाळ्याची चौकशी करेल आणि जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येणार आहेत, असा दावा भाजप नेते करत आहेत.मात्र येत्या ४ जूननंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे, असा विश्वास व्यक्त करत मोदींच्या प्रचाराला भुलू नका, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.