मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission)देशातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात जाहीर केल्या होत्या. यापैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. अशातच आता प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला . त्यानंतर त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खटके उडत आहेत . किशोर यांनी बिहारच्या राजकारणावरुन भाजपावर टीका केली आहे. भाजपाने बिहारच भविष्य बदलण्यात इंटरेस्ट दाखवला नाही त्यांना बिहारच्या लोकांची अजिबात चिंता नाही त्यांच्या पूर्ण मागासलेपणासाठी फक्त भाजप जबाबदार आहे . असा आरोप त्यांनी केला आहे .
भाजपने 2020 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकूनही बिहारच भवितव्य बदलण्याची जबाबदारी उचलली नाही. त्यांनी विचार न करता फक्त 42 आमदार असलेल्या नितीश कुमारांकडे राज्य सोपवलं अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे . तसेच. “विविध पक्ष फोडून भाजपाने अन्य राज्यात सरकार बनवलं असेही ते म्हणाले आहेत . बिहारच्या लोकांसोबत काय होईल? याची भाजपाला अजिबात चिंता नाहीय’ असा आरोप त्यांनी केला आहे . यावरून आता बिहार भाजपाचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी प्रशांत किशोर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशांत किशोर यांचे हे सर्व आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याच त्यांनी म्हटलं आहे. ‘
राजकीय रणनीतीकारांच्या आरोपानंतर मनोज शर्मा म्हणाले , भाजपाने जी काही मदत केली आहे ती राज्य आणि पक्षाच हित डोळ्यासमोर ठेऊन पीकेला 2005 आधीची बिहारची स्थिती माहित नाही. जेडीयू आणि आम्ही दोघांनी मिळून बिहारची RJD च्या जंगलराजमधून सुटका केली.भाजपचे त्यांच्याविषयीचे धोरण चांगले आहे असे शर्मा म्हणाले .