मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे . यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde) यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतात. त्यांच्या संरक्षकांच्या हातात बॅगा देखील आहेत असे म्हणत .या निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पडतोय. मुख्यमंत्री शिंदेनी १२- १३ कोटी रुपये वाटले, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राज्यभरात भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी या निवडणुकीसाठी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप राज्यातील विरोधक करताना दिसत आहेत. अशातच आता संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधत आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून पोस्ट केली आहे . नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे,मात्र .त्यांनी पैशाचा कितीही पाऊस पाडला तरी नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित आहे. बारामतीमधील बँक सकाळपर्यंत उघड्या होत्या. नाशिकमधील व्हिडिओ मोठा पुरावा आहे.असे राऊतांनी म्हटले आहे .
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शाहू महाराज यांना पराभूत करण्यासाठी किमान 15 ते 20 दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. आम्ही त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी हे महाशय हॉटेल शालीमारला उतरले होते. त्यांनी पैशाचा वाटप केलं तरी शाहू महाराज विजय होत आहेत, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे .