मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काल मध्यरात्री भाजपच्या (bjp )नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाबाबत महत्वाची चर्चाही करण्यात आली. आगामी टप्प्यातील मतदानाच्या दृष्टिकोनातून पक्षाचे धोरण, मतदानाची घसरलेली टक्केवारी याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएसएसचे समन्वयक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील( Chandrakant Patil ), गिरीश महाजन( Girish Mahajan०), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उपस्थितीत होते. दरम्यान सोमवारी पुण्यात मतदान होणार आहे . त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत .
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे . या पार्शवभूमीवर आज शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडूनही आज सभा होणार आहेत ..यामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार अमोल मिटकरी यांची सभा होणार आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री भास्करराव जाधव, चंद्रकांत हंडोरे, आमदार सचिन अहिर व प्रवीण गायकवाड यांच्या तोफा आज शिरूर लोकसभा मतदारसंघात धडाडणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार असून कोण कोणावर निशाणा साधते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान याआधी लोकसभा निवडणुकीचे तीन टप्प्यातील मतदान देशभरात पडले आहे. मात्र अजूनही मतदानाचे चार टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रातही तीन टप्प्यांत मतदान झाले आहे मात्र अद्यापही पुणे, नाशिक, मुंबईसह अनेक महत्वाच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे.दरम्यान मावळमध्ये आणि पुण्यामध्ये ही प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून आज आपापल्या मतदारसंघात नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावला जाणार आहे .