ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात हमरीतुमरी

By Vivek BhavsarX : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही कामे होत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा स्फोट आज विधानभवनात झाला. आमदार महेंद्र थोरवे आज थेट मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर धावून गेले. मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, विधान भवनात असंख्य लोकप्रतिनिधी आणि लोकांसमोर हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अर्थसंकल्पात घोषणाचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ’; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत ‘अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकऱ्यांसाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गुणरत्न सदावर्तेंकडून 10 टक्के मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान!

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असताना आता गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणप्रकरणी सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे. 27 फेब्रुवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकीय पक्ष युवक व वि‌द्यार्थ्यांचे व्होट विकत घेऊ शकत नाही…! – खा. तेजस्वी सूर्या

नागपूर : मागील 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशाचा जो आर्थिक विकास केला, त्यामुळे देशाचे नाव संपूर्ण जगात सन्मानाने घेतल्या जात आहे. स्टार्टअप इंडिया आणि मोदींच्या इतर योजनांमुळे आपला देश जगातील पाचवी मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे, अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. G20 संमेलनामुळे देशात सर्वच […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपच्या 155 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, लोकसभेसाठी कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंहसह तब्बल १५५ जणांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी, अमित शाहांना गांधीनगर, राजनाथ सिंहना लखनऊ, स्मृती इराणी अमेठी, धर्मेंद्र प्रधान यांना ओडिसातील संबलपूर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सुजाता आनंदन यांच्या निधनाने पुरोगामी विचारांचा निर्भीड पत्रकार काळाच्या पडद्याआड, नाना पटोलेंचा शोकसंदेश

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक सुजाता आनंदन यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आणि मनाला चटका लावून गेले. सुजाता आनंदन यांच्या निधनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणा-या पुरोगामी विचारसरणीच्या निर्भीड पत्रकाराला आपण गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. सुजाता आनंदन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, सुजाता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी म्हणून….’ ; क्लाईड क्रास्टोंचा मोठा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेत एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी २८ फेब्रुवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘NMFDC’च्या 500 कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘जमिअत-उलेमा-ए-महाराष्ट्र’सह अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील 10 टक्के आरक्षण घेण्यास तयार, पण…

जालना मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतू यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी SCBC आरक्षण दिले आहे. हे आरक्षण मान्य नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी घेतली होती. आपणात ओबीसीमधील आरक्षण हवे असल्याचे त्यांनी म्हटले होते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा’, मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षरी प्रकरणी वडेट्टीवारांची टीका

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना होतात हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पॉंईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ही मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले की, […]