जालना
मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतू यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी SCBC आरक्षण दिले आहे. हे आरक्षण मान्य नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी घेतली होती. आपणात ओबीसीमधील आरक्षण हवे असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता मात्र SCBC दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दर्शवली आहे.
मग सगेसोयऱ्यांची मागणी पूर्ण करणार का?
मी एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून माझ्यावर टीका करण्यात आली. मग आता अहो-जाओ केल्यानंतर सगेसोयऱ्यांची मागणी पूर्ण करणार का? मग रोज अहो-जाओ करतो. मराठ्यांनाही सांगतो यांना अहो-जाओ करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यांनीही समाजाची नाराजीची लाट ओढून घेऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांची भावना समाजाच्या प्रती बरोबर आहेत. परंतु सध्या ज्वलंत मुद्दा असताना राजकीय निर्णय नको. माझा तो मार्ग नाही. माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा आरक्षण आहे.