ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांदा निर्यात बंदीवरुन शरद पवार थेट मैदानात, चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

नाशिक केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकमधील चांदवड येथे रस्तारोको आणि सभा घेण्यात आली. यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल […]

मुंबई महाराष्ट्र

इक्बाल मिर्ची देशभक्त आहे का? मलिकांना जो न्याय तो पटेलांना का नाही? काँग्रेस नेत्याचा घणाघात

नागपूरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अजित पवारांना नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशावर विरोध व्यक्त केल्यानंतर आज स्वत: नवाब मलिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काँग्रेस नेत्याच्या एका ट्विटमुळे भाजप कोंडीत पकडला जाण्याची शक्यता आहे. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी जवळीक असलेला आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मिर्ची कुटुंबीयांशी (Iqbal Mirchi) प्रॉपर्टीचा व्यवहार केल्याचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोठी बातमी! नवाब मलिकांना महायुतीत एन्ट्री नाहीच, फडणवीसांचा स्पष्ट नकार

Twitter : @therajkaran नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे त्यांनी अजित पवार गटाचं नेतृत्व मान्य केलं असून आता ते महायुतीत सामील होतील, अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्राने अनेकांना (Devendra Fadnavis refused) धक्का बसला आहे. नवाब मलिकांना महायुतीत सामील करून घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘राजकारण’ने 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब, मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवारांचं नेतृत्व मान्य

मुंबई हिवाळी अधिवेशनाच्याआजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य नवाब मलिक (NCP MLA Nawab Malik) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यापूर्वी ते अजित पवार गटाच्या (Ajit Pawar faction of NCP) कार्यालयातही गेले होते. याशिवाय अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत त्यांच्या कार्यालयात नवाब मलिकांनी (Malik’s support to Ajit Pawar’s group) चर्चा केल्याचं वृत्त आज सकाळी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवींद्र धंगेकर झाले ‘डॉक्टर’, नेमका काय आहे विषय?

Twitter : @therajkaran नागपूर महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू असताना दुसरीकडे धंगेकरांनी पुणे स्टाइलने सत्ताधाऱ्यांविरोधातील आपला आक्षेप नोंदवला. यावेळी धंगेकर चक्क डॉक्टरांच्या वेशात आले होते. त्यांच्या अॅप्रनवर विविध संदेश लिहिण्यात आले होते. यातील एक मुद्दा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवाब मलिक अजित पवार गटाच्या कार्यालयात, दादा गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत चर्चा

नागपूर आजपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या वादळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिकांच्या नावावरुन चर्चा सुरू झाली आहे. नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या कार्यालयात गेल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत त्यांच्या कार्यालयात नवाब मलिकांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवाब मलिक अजित पवारांच्या गटात जाणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दर तासाला एक या वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विरोधी पक्षांचा आरोप 

Twitter : @therajkaran नागपूर सध्याचे महायुती सरकार हे पक्ष फोडून स्थापन झालेले सरकार आहे. कायदा- सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून सर्वाधिक दंगली या सरकारच्या काळात झाल्या. एक तासाला एक या पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या प्रमाणानुसार एक वर्षात २२ हजार सातशे ४६ आत्महत्या (farmers suicide) कर्जबाजारीपणा, दिवाळखोरीमुळे झाल्या. अवकाळी पाऊस, दुष्काळाशी (drought) चार वर्षे शेतकरी झुंजत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजीनामा मागे घेण्याची माझी कुवत, शरद पवारांचं अजित पवारांना थेट उत्तर

राजीनामा मागे घेण्याची माझी कुवत, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, विचारांशी बाधील आहोत, संधीसाधू नाहीस; पवार बरसले पुणे राजीनामा मागे घेण्याची माझी कुवत आहे, त्यासाठी कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. अजित पवार म्हणाले त्यातील बऱ्याच गोष्टी मलाही पहिल्यांदाच समजल्या. त्यात स्फोट होता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांचे आरोप खोडून काढणार? शरद पवारांची आज ४ वाजता पत्रकार परिषद

अजित पवारांनंतर आता शरद पवार बोलणार; अजितदादा गोटात मोठी हालचाल मुंबई अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकांसंदर्भात काल कर्जतमध्ये घेतलेल्या बैठकीत शरद पवारांचं नाव न घेता मोठे गौप्यस्फोट केलेत. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी आज शरद पवारांनी सर्व आमदार आणि खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं जातंय. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा  Twitter : @NalavadeAnant मुंबई खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP of Sharad Pawar faction) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे. दुष्काळ (drought), नापिकी, अवकाळी पाऊस (unseasoned rain) आणि चुकीच्या सरकारी धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश […]