ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला तर पुढची पायरी आहेच : जयंत पाटील

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

निवडणूक आयोगात गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) काही निकल आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून आयोगाने निर्णय दिलाच तर पुढचे पाऊल उचलू, असा इशारा देताना पाटील यांनी हे पाऊल काय असेल हे मात्र गुलदत्यात ठेवले.

जयंत पाटील म्हणाले की, आमचे सर्व मुद्दे कागदावर आहेत. विरोधी गटाने १० वर्षांच्या मुलांचे, झोमॅटो डिलिव्हरी (Zomato delivery boy) करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे, गृहिणींचे एफिडेवीट दिले आहेत. जिल्ह्यात ३२ जिल्हाध्यक्ष म्हणून एफिडेवीट दिले आहे, ज्यांचा पक्षाशी संबंध नाही. ज्यांना एफिडेवीट कशासाठी देतो हे ही माहिती नाही, असे एफिडेवीट दिले आहेत, असा गंभीर आरोप करत हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि निवडणुक आयोग ही बाब लक्षात ठेवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे. बहुसंख्य आमदार कुठे जातात त्याच्या मागे पक्ष जातो असे नाही. तर बहुसंख्य कॅडर कुठे आहे यावर पक्ष अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्टीकरण दिले असून त्यामुळे मला वाटत नाही की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला जाईल. पण दिलाच तर पुढची पायरी आहे, असा सूचक इशाराही पाटील यांनी दिला.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सरकारमध्ये असलेल्या मतभेदांवर भाष्य करताना ते म्हणाले की, सरकारमधील काही लोक ओबीसींना (OBC) चुचकारत आहेत, तर काही मराठ्यांना चुचकारत आहेत. सरकारचा दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारला विनंती आहे की तुम्ही एका ठिकाणी बसा आणि याबाबत योग्य निर्णय करा असे आवाहनही त्यांनी सरकारला केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला कोणाच्याही भावना दुखवायचा नाहीत. पण मराठा आरक्षणाबाबत काय करणार, ओबीसींचे काय करणार, धनगर समाजाच्या आरक्षणाचा (Dhangar reservation) मुद्दा आहे. जे अतिशय महत्वाच्या पदांवर ते दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाही, त्यांनी ही बोलले पाहीजे असा मार्मिक चिमटाही त्यांनी काढला.

महाराष्ट्र गुंतवणुकीत चौथ्या क्रमांकावर गेला आहे. मात्र सरकार इव्हेंट करणायात इतके मशगुल आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. गुंतवणूक महाराष्ट्र यावी यासाठीचे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. बेरोजगारीचा दर १०.९ इतका झाला आहे. यापेक्षा जास्त बेकारी असणार ही जास्त वाईट असल्याचा धोकाही पाटील यांनी व्यक्त केला.

अभिषेक मानू सिंघवी यांनी केली प्रतिज्ञापत्राची चिरफाड : जितेंद्र आव्हाड

ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी

दरम्यान, जयंत पाटील यांच्या डाव्याची पुष्टी करताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट केले आणि त्यात नमूद केले की, आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि पक्ष याबाबतच्या वादासंबंधी सुनावणी होती. फुटीर गटातर्फे जे प्रतिज्ञापत्र देण्यात आलं होतं. त्या प्रतिज्ञापत्रात जी काही प्रतिज्ञापत्र जोडली होती, त्याची चिरफाड अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) या ज्येष्ठ वकिलांनी केली. त्यांनी त्या प्रतिज्ञापत्राचे 24 भाग बनवले आणि त्याच्यामध्ये दाखवून दिलं की, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्र जोडली होती, वृद्धांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्य दाखविले होते. मृत व्यक्तींच्या नावाने प्रतिज्ञापत्र होती. एका प्रतिज्ञापत्रावर तर हाऊस वाईफ हे नाव लिहीण्यात आलं होतं. काही ठिकाणी एकाचेच नाव तीन वेळा टाकण्यात आलं होत. एकाच पत्त्यावर अनेक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आली होती. वेरीफिकेशन लातूरचं आणि प्रतिज्ञापत्र मुंबईचं. अशा प्रकरणात जवळ-जवळ 20 हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी सादर करण्यात आली आहेत, असं ज्येष्ठ वकील अभिषेक संघवी यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यासहीत दाखवून दिलं. फुटीर गटाचे वकील ज्येष्ठ विधीतज्ञ मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी खूप युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, आताच्या क्षणाला याची गरजच नाही. परंतु, निवडणूक आयोगाने ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. अभिषेक मनुसंघवी यांनी भारतीय संविधानाप्रमाणे (Constituion of India) प्रतिज्ञापत्रावर खोटं बोलणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली. पुढे काय होईल याची मला माहिती नाही. पण, हे सगळं खोट आहे, खोट्याच्या आधारावर आहे. हे मात्र समोर आलं. जे खोट्याच्या आधारावर वागतात ते शेवटी खोटचं करतात हे सिद्ध झालं. निवडणूक आयोग काय निकाल देईल याच्याशी फार काही मला समजून घ्यायची इच्छा नाही. पण पुराव्यानिशी हे सिद्ध करण्यात आलं की, हे केलेलं सगळं खोट होत. म्हणजे मी जे म्हणतोय तेच ‘अधर्माविरुद्ध धर्माची लढाई’

अजित पवार गटाची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

दरम्यान, अजित पवार गटाचे युयक कॉँग्रेस पदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “असत्य आणि अधर्म हे तुमचं ब्रीद वाक्य आहे…धर्माची भाषा तुमच्या तोंडून शोभून दिसतं नाही. खोटं बोलावं पण एवढं ? 20 हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी आहेत हे सिद्ध करावं, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. महाराष्ट्राच्या जनतेची व पवार साहेबांची दिशाभूल करणं थांबवा,” असे ट्विट सूरज चव्हाण यांनी केले आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात