ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगडसाठी तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब ; अजितदादांचा पहिला उमेदवार जाहीर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटात मतभेद सुरू आहेत . अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिला उमेदवार रायगड जिल्ह्यातूनच (Raigad Loksabha)जाहीर केला आहे. या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांना उमदेवारी देण्यात आली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुकीच्या रिंगणात भाजपाची ‘स्टार पॉवर’, सेलिब्रिटिंना तिकिटे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने भाजपाने (BJP)जय्यत तयारी केली असून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात सेलिब्रिटींना ( Star Powar Celebrity )उतरवले आहेत. भाजपाने आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौतपासून भोजपुरी स्टार मनोज तिवारी, निरहुआ यांच्यापर्यंतच्या उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने रविवारी जारी केलेल्या पाचव्या यादीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले लोकसभेसाठी राजू शेट्टीनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार .;जयंत पाटलांचे भाष्य

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टीनी (Raju Sheeti ) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Loksabha) एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.तर महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महादेव जानकरांचं ठरलं! बारामतीऐवजी परभणीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar)महायुतीत आल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार की परभणी लोकसभा मतदारसंघातून अशी चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,महादेव जानकर हे बारामतीऐवजी परभणी लोकसभा ( Parbhani Loksabha )मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच , त्यांची औकातच नाही की तो एवढा…;” मिटकरींचा आरोप

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना बारामती (Baramati )लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार गट (Ajit Pawar Group )आणि शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यात चांगलीच वादाची ठिणगी पडली आहे . विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचा पक्का निर्धार व्यक्त केला आहे. अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असंही त्यांनी म्हटलं आहे .यावरून आता त्यांच्यावर अजित पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शिवसैनिको नाराज होऊ नका .. मी कुणासाठीही आग्रही नाही ” ; नाशिकच्या जागेवरून भुजबळांचा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढणार या चर्चेला जोर आला होता . यावर आता त्यांनी निवडणूक लढवणार का याबाबतचा खुलासा केला आहे . ते म्हणाले , “शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मी पण शिवसैनिक म्हणून आलोय. नाराज होण्याचे कारण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“….. तर त्यांची उमेदवारी काढून घ्यावी ” ; अभिजीत गंगोपाध्यायांच्यावर काँग्रेसकडून टीकेची झोड

मुंबई : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay)यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse)यांच्यावरुन टीका टिप्पणी केली आहे . यावरूनच आता त्यांच्यावर काँग्रेसने(Congress) टीकेची झोड उठवली आहे .काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश( Jairam Ramesh)यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट लिहीली आहे. “अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात ? हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचं जागावाटप अजून रखडलेलं असताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election )रिंगणात उतरले आहेत. भुजबळांकडून लोकसभेची चाचपणी केली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या वादात नशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. छगन भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकांसाठी संघाची विशेष मोहीम, संघटनात्मक हालचालींना वेग

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. संघाकडून प्रत्यक्षात राजकीय पक्षाचा प्रचार करण्यात येत नसला तरी संघाकडून मतदानवाढीसाठी पुढाकार घेतला जात आहे. लोकसभेसाठी संघ परिवारातर्फे विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोट्या बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांना सक्रियपणे काम करण्याचे निर्देश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी आढळराव पाटील हातात घड्याळ बांधून निवडणुकीच्या रणांगणात, आज राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून बाहेर पडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आढळराव पाटील शड्डू ठोकणार आहेत. आज २६ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल […]