मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचं जागावाटप अजून रखडलेलं असताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election )रिंगणात उतरले आहेत. भुजबळांकडून लोकसभेची चाचपणी केली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या वादात नशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. छगन भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.त्यामुळे नाशिकचे सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे . त्यामुळे महायुतीत(Mahayuti ) नवा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे .
नाशिकच्या (Nashik)जागेवरून महायुतीतील तिढा अजूनही सुटला नसताना त्यात आता भुजबळांच्या एन्ट्रीने नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्याकडून मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. त्यामुळे जर या ठिकाणी सकारात्मक स्थिती दिसली. तर मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी केली जाऊ शकते. भाजप आणि शिंदे गटा वाद असतील तर आम्ही या ठिकाणाहून लढतो, अशी भूमिका अजित पवार गट घेऊ शकतो. दरम्यान, या सगळ्याबाबत छगन भुजबळ यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही .मध्यंतरी झालेल्या मराठा आंदोलनातील छगन भुजबळांची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास त्यांनी विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेचा काय परिणाम होऊ शकतो? जर भुजबळ या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिले तर मराठा आरक्षणाबाबतच्या त्यांच्या भूमिकेचा फायदा होणार की तोटा? याची चाचपणी सध्या सुरु आहे.
सध्या शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे(Hemant Godse) हे नाशिकचे खासदार आहेत. पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून ते आग्रही आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांनी काही दिवसांआधी बोलताना हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. त्यांनंतर महायुतीतील विशेषत: भाजपचे नेते, कायकर्ते नाराज झाले होते. भाजपचे नेते, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय आता छगन भुजबळदेखील निवडणूक लढण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती आहे.त्यामुळे महायुतीत अजून काय पाहावं लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे .